पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथे आमदार संजय जगताप मिञ परिवाराच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माळशिरस गाव ते श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान रस्त्यावर स्वर्गीय कै. वसंत नाना यादव यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणा-या स्वागत कमानीचे भुमीपुजन आमदार संजय जगताप यांनी केले. त्याचप्रमाणे घेण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांचा बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रदेश युवक काॅग्रेस सरचिटणीस गणेश जगताप, मुंबईचे पोलीस निरीक्षक संजय यादव, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सोनाली यादव, सुनिता कोलते ,माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके माजी सरपंच एकनाथ यादव, अरुण यादव,शांताराम यादव,बाळासो यादव,पुणे मार्केटचे व्यापारी राजेंद्र यादव, दिलीप मोरे, जिल्हा सचिव संघटनेचे रफिक शेख , ह भ प लक्ष्मण महाराज यादव उपस्थित होते. सूञसंचलन व प्रस्तावित माजी उपसरपंच माऊली यादव यांनी केले.
२२ भुलेश्वर
माळशिरस येथे मार्गदर्शन करताना पुरंदरचे आमदार संजय जगताप व इतर