निवडणुकांपूर्वी आघाडी युती याचा चर्चांना काहीच महत्त्व नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. पुण्यामध्ये आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस ने थेट आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. महापालिका निवडणुकांना आता अगदी काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे आता काँग्रेस ची भूमिका लक्षात घेता सेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार की स्वतंत्र निवडणुका लढवणार याची चर्चा सुरू झाली आहे.त्यातच पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंचा भेटी नंतर नवीन राजकीय गणिताचे आडाखे देखील बांधले जात आहेत.
याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले ,"ज्या वेळेस निवडणुका लागतील ना त्या वेळेस कोणा कोणाची आघाडी आणि कोणाकोणाची युती ते व्यवस्थित सांगतो. आत्ता प्रत्येक जण आपला पक्ष वाढण्याचा प्रयत्न करणार. कॉमन मिनीमम कार्यक्रमावर आम्ही सगळे सध्या सरकार व्यवस्थित चालवत आहोत."