गेल्या दशकात शिक्षण, रोजगार, व्यवसाय, उद्योजकता व व्यावसायभिमुख कौशल्य यांचे समीकरण झपाट्याने बदलत आहे. हा काळाचा बदल असला तरी; विश्लेषणात्मक दृष्टीने विचार केल्यास इंटरनेट व इतर संगणक निगडीत तंत्रज्ञानाचा वाढता वापर, अर्थकारण, व्यवसाय, खासगीकरणाचे वाढते व बदलते स्वरूप आणि जागतिक स्तरावरील उद्योगांची व रोजगारांच्या नवीन वाटांची रेलचेल ही यामागे मुख्य कारणे दिसतात. या सर्वांच्या परिणामामुळे विद्याशाखा एकमेकांत मिसळल्या गेल्या. त्यांचे समान अवकाश वाढत गेले व रोजगाराकरिता जी कौशल्य लागतात तीसुध्दा अधिक व्यापक होत गेली. आता विषयाच्या ज्ञानाबरोबर अनेक पूरक विषयांचे ज्ञान, कामाचा प्रत्यक्ष अनुभव, व्यक्तिमत्त्वाच्या विविध कंगोऱ्यांचा विकास, हे सर्व महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे लिबरल आर्ट्स या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळेल.
-----------------------------
-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तीन वर्षांचा , सहा सत्रांचा बी.ए. (लिबरल आर्ट्स हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
-विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.
--------------------------------
अभ्यासक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये :
*कौशल्याचे व क्षमतांचे आंतरविद्याशाखीय अन्वेषण.
* रोजगार, उद्योजकता व उच्च शिक्षणाला समर्थपणे सामोरे जाण्याकरिता एक भक्कम पाया विकसित करणे.
* विद्याशाखांच्या चौकटीच्या पलीकडे जाणाऱ्या आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, कल व समृद्धी विकसित करणे.
* उच्च शिक्षण, व्यवसाय व रोजगाराच्या बदलत्या (परिस्थितीला) सशक्तपणे हाताळण्यासाठी विद्यार्थांना सक्षम व सशक्त बनविणे.
* खऱ्या अर्थाने परिपूर्ण, सक्षम असे शिक्षण .
*बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण.
विद्यापीठातील बॅचलर आॅफ लिबरल आर्ट्स हा अभ्यासक्रम इंडियन स्कूल आॅफ सायन्स (आयडीएसएस )अंतर्गत समाविष्ट केला असून त्याची संरचना अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने केली आहे.
* कोअर पेपर, मेजर, मायनर, इलेक्टिव्ह, स्किल बेस्ड, प्रोजेक्स्ट्स अॅण्ड एक्सपेरेंटिअल लर्गिंग सात पातळ्यांवर पेपर्सची रचना
* कोअर पेपर्स वगळून प्रत्येक पातळीवर भरपूर निवडीचे पर्याय.
* कौशल्य विषयांची पारंपरिक परीक्षा न घेता कौशल्यांचे मूल्यमापन
* सामाजिक बांधिलकी, सामाजिक कौशल्यांचे व मूल्यांचे एक सशक्त, वेगळे अवकाश स्वयंसेवी संस्थांसोबत इंटर्नशिप, इतर विभागांबरोबर प्रकल्प, एव्हेंटस् अशा माध्यमातून हे साधण्याचा प्रयत्न केला जातो.
---------------------------------
देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात सुचविलेले दूरगामी आणि व्यापक बदलांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात केला आहे. आंतरविद्याशाखीय पाया, कौशल्य/ व्यावसायिक विषय, इंटर्नशिप व कृतिशिक्षण, अनुभवात्मक शिक्षण, सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकीची जाण आदी घटकांचा त्यात समावेश आहे.
------------------------------
डॉ. एम. जे. चासकर, अधिष्ठाता,
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ