शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

संमेलनात ग्रंथदिंडी ठरणार वैशिष्ट्यपूर्ण

By admin | Published: January 07, 2016 1:09 AM

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या आगामी ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी वैशिष्ट्यपूर्ण ठरणा

पुणे : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या आगामी ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून, तिचा प्रारंभ सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (१५ जानेवारी) दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ग्रंथदिंडीचा प्रारंभ होईल. अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची उपस्थिती असेल. संत, पंत आणि तंत कवी यावर आधारित तीन स्वतंत्र चित्ररथांचा ग्रंथदिंडीत समावेश असेल. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, गोरा कुंभार, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि शाहीर यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी चित्ररथांचे सारथ्य करणार आहेत. अभंग, पोवाडा, श्लोकांच्या सुरावटीत चित्ररथ मार्गस्थ होतील.महिला संत, माहिती तंत्रज्ञान, कामगार, पर्यावरण दिंडी, विविध देशांतील पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि झिम्मा, फुगडी आणि मंगळागौरीचे विविध खेळ खेळणाऱ्या महिलांचे स्वतंत्र पथक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, राज्यघटना, सकल संत गाथा, महात्मा जोतिबा फुले यांचे ग्रंथ, शिवाजी सावंत यांची कादंबरी, मंगेश पाडगावकर यांचे कवितासंग्रह, लीळाचरित्र, भगवद्गीता, मोरया गोसावी यांचे चरित्र आदी अनमोल ग्रंथ पालखीत ठेवण्यात येतील. आळंदी, देहू आणि मोरया गोसावी देवस्थानातील वारकरी दिंडीत सहभागी होणार आहेत. निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांचे ढोल, ताशा, लेझीम व झांज पथक, पुण्याच्या पाचंगे बंधूंचे सनई, चौघडा व तुतारीवादन, साताऱ्याच्या कुलकर्णींचे अब्दागिरी व वारकरी झेंडे ग्रंथदिंडीची शोभा वाढविणार आहेत. (प्रतिनिधी)