लेफ्टनंट जनरल मिलिंद भुरके हे मूळचे कोथरूड येथील रहिवासी आहेत. त्यांना बालपणापासूनच सैन्यदलाची आवड होती. त्यांचे वडील नारायणराव भुरके हे रेल्वेत अधिकारी होते. त्यांनी मिलिंद यांना लष्करात जाण्यासाठी प्रेरित केले. त्यांचे शिक्षण हे सातारा येथील सैनिकी शाळेतून पूर्ण केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि भारतीय सैन्य अकादमीत प्रशिक्षणादरम्यान त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान, त्यांनी खरगपूर येथील आयआयटीतून संगणक क्षेत्रात एमटेक पूर्ण केले. यासोबतच त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधूनही लष्कराचा उच्च अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांच्या लष्करी कारकिर्दीत त्यांनी जम्मू काश्मीर, राजस्थान तसेच उत्तर पूर्व सीमांवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात त्यांनी मुख्य सिग्नल अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. २०१५ ते १७ दरम्यान ते आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे ते प्रमुख होते.
काॅर्प्स ऑफ सिग्नल्सच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल मिलिंद भुरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:17 AM