नेहमी आशूला ताई म्हणून त्रास देणारा हट्ट करणारा अवि एकदमच मोठ्या भावासारखा अतिसमंजस झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत असं काय झाल की, एक खोडकर मुलगा, भाऊ एकदम परिपक्व झाला. सकाळीच पाचला उठून आशू, अवि, उठा पटापट असा आईचा गोड आवाज येणं बंद झाल होतं. पंधरा दिवसांपूर्वी चक्कर येऊन पडलेली आई पुन्हा अजून तरी बोललेली नव्हती. पहिल्या रक्ततपासणीत कर्करोगाचा संशय होता. माने जवळच्या छोट्या गाठीची बायस्पी केली आणि रिपोर्ट जो नको तोच म्हणजे पॉझिटिव्ह आला आणि एकदमच असं कसं होऊ शकतं ? म्हणून अलोक आपली पत्नी अनूच्या या अहवालाकडे पाहून मनाने पूर्ण कोलमडून पडला होता. एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर असणारा निष्णात व्यक्ती नियतीपुढे हतबल झाला होता. घराच्या अंगणातील प्रफुल्लित दिसणारी माती ही बाईसाहेबानी पंधरा दिवसांपासून सडा टाकला नाही म्हणून हिरमुसली होती. झाडावर येणारी पारिजातकाची फुलं फुलण्याआधीच गळून पडू लागली होती.
हा निसर्ग खूप भरभरून देतो आणि हे जीवन सुंदर आहे असं सतत म्हणणारी अनू कोमात असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात कमालीचं भीतीचं वातावरण होतं.
घरात अनुभवाच मोठं गाठोडं म्हणजे राधाआजी. वयाच्या ऐंशीतही घराला घरपण देणारी, देवावर प्रचंड श्रध्दा असणारी आणि सून लवकर बरी होणारच म्हणून नेहमीच सकारात्मक असणारी ही आजी पंधरा दिवसांपासून जप करत बसली होती. आजींना काहीतरी, कशाची तरी अनुभूती झाली आणि त्यांनी हे जीवन सुंदर आहे या गाण्याचा ऑडिओ मोबाईलच्या हेडफोनव्दारे अनूच्या कानात ऐकंव असा सल्ला अलोकला दिला आणि घरातील छोट्या गोड कुत्र्याच्या पिलाने शेपटी हलवली.
त्याला काय वाटलं काय माहीत? पण त्याच्या डोळ्यांत ही आसवे होती. कारण मागच्या सहा महिन्यांपूर्वीच त्याला मालकीणबाईंनी घरी आणले होते. थंडीत रात्री एका झाडाखाली काकडत असताना. अलोकनी मोबाईलमध्ये ते गीत लोड केले आणि पुन्हा दवाखान्यात आला. डॉक्टर असं करायला प्रथम नाही म्हणाले पण अलोक, आशू, अविच्या विनंतीपुढे डॉक्टरांचेही नेत्र पाणावले. ते म्हणाले की, मी समोरच थांबतो. फक्त पाच मिनिटेच ते गाणे लावा आणि एक नवा प्रयत्न झाला अचानक गेलेली हॉस्पिटलची लाईट आली, जनरेटरचा आवाज शांत झाला. ते मोबाईलमधील गीत कॉड लावून अनूच्या कानात लावले. एका मिनिटातच चमत्कार झाला कॉड हलायला लागले आणि अनूची मान. पुन्हा तोच गोड आवाज आला आशू, अवि उठा लवकर लवकर घरातील परिवाराला आनंदाची सीमा राहिली नाही. तेच गाणं होतं " हे जीवन सुंदर आहे " आणि काही दिवसांत अनूला अमेरिकाला शिफ्ट केलं आणि डॉक्टरांनी पूर्ण बरी होण्याची खात्री दिली
राधाआजी म्हणाली की, नेहमी सकारात्मक राहावे अलोक आणि तो आहे ना भगवंत तू कशाला काळजी करतोय?
---
गिरीश वसेकर (देशपांडे )
Attachments area