पुणे : कोथरूड मतदार संघ (२१०) येथे कर्तव्यावर असलेला एक कर्मचारी आणि मतदानासाठी आलेल्या एका नागरिकाचे अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. बी. व्ही. जी व एमईएमएसच्या १०८ रुग्णवाहिकेने तातडीने अत्यावश्यक सेवा दिल्याने त्यांना जीवनदान मिळाले आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना कर्तव्यावर असलेले भरत अरुण जगताप व आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले विनोद थापा यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांच्यावर तातडीचे उपचार करून पुढील उपचाराकरिता खासगी कोथरूड येथे त्यांना आणले. परंतु तेथे अतिदक्षता बेड उपलब्ध नसल्यामुळे सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले.विनोद थापा (वय २१, रा. लोकमान्य वसाहत, महादेवनगर कोथरूड) हा युवक सह्याद्री प्रशाला कोथरूड येथे मतदानास आलेला असताना अचानकपणे झटके आल्याने त्याची प्रकृती बिघडली. १०८ रुग्णवाहिकेने त्वरित उपचार चालू केले व पुढील उपचाराकरिता ससून सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल केले.डॉ. दिपक पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली व बी. व्ही. जी १०८ जिल्हा व्यवस्थापक डॉ. वेदव्यास मोरे आणि रुग्णवाहिका वरील डॉ. स्मिता दर्शनकर, डॉ. अश्विनी देशपांडे व चालक अविनाश ओव्हाळ यांनी त्वरित प्रतिसाद देऊन्ºया कर्मचाºयाचे व मतदाराचे प्राण वाचविले..................पुणे महापालिका प्रशासन आरोग्य विभाग व बी.व्ही.जी १०८ रुग्णवाहिका जिल्हा व्यवस्थापक डॉ. वेदव्यास मोरे, डॉ. प्रियांका जावळे यांनी योग्य समन्वय साधून उत्कृष्ठ नियोजन करून १०८ रुग्णवाहिकेची तत्पर सेवा उपलब्ध करून दिली.-विठ्ठल बोडखे, विभागीय व्यवस्थापक बी. व्ही. जी. १०८
पुण्यात १०८ रुग्णवाहिकेच्या तत्पर सेवेने दोघांना मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:59 AM