शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

पुण्यातील डॉक्टरांनी दिले विदेशी नागरिकाला जीवनदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 8:29 PM

फिलिपिन्समध्ये त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये महारोहिणीत एक स्टेंट टाकण्यात आला आणि त्यांचे रोजचे जीवन व काम पुर्ववत करण्यात यश आले.

पुणे : दोन वर्षांपूर्वी घानातील एका 60 वर्षीय नागरिकाला गंभीर हदयरोग झाला होता. त्यांच्या महारोहिणीमध्ये फुगवटा झाल्यामुळे फुटण्याचा धोका बळावला होता. चाचण्यांद्वारे लक्षात आले की टाकलेली स्टेंट ही आपल्या आधीच्या स्थितीतून किंवा जागेतून विस्थापित झाली होती. स्टेंटच्या आधीच्या जागी गळती निर्माण झाली होती. यामुळे मांडीच्या सांध्यातून कॅथेटरद्वारे एंडोव्हॅस्क्युलर अ‍ॅन्युरिझम ही प्रक्रिया करणे सर्वांत प्रभावी उपाय होता. त्यामुळे फुगवटा झालेल्या महारोहिणींमध्ये दोन स्टेंट टाकल्या. पहिली स्टेंट एओरटिक आर्च (चढणा-या व उतरणा-या वाहिन्यांमधील वाकलेल्या स्थितीत असलेली रोहिणी) व दुसरी स्टेंट त्याच्या खाली लावण्यात आली...अशा रितीने यशस्वी शस्त्रक्रिया करून पुण्यातील डॉक्टरांनी या विदेशी नागरिकाला जीवनदान दिले.     फिलिपिन्समध्ये त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये महारोहिणीत एक स्टेंट टाकण्यात आला आणि त्यांचे रोजचे जीवन व काम पुर्ववत करण्यात यश आले.मात्र दोन वर्षांनंतर हीच परिस्थिती पुन्हा ओढवली. सतत खोकला येत होता आणि या खोकल्यामुळे काही वेळेस रक्तातील छोट्या गुठळ्या देखील बाहेर यायच्या. छातीत जड वाटू लागल्याने श्वसनाचा त्रास वाढत चालला होता. तेव्हा त्यांनी रूबी हॉल क्लिनिकमधील  डॉक्टरांची भेट घेतली. कार्डिओलॉजिस्ट डॉ.सी.एन.मखळे म्हणाले,  रक्ताने भरलेल्या रोहिणी जर फुटल्या तर ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. एओरटिक डायसेक्शन ही स्थिती सामान्यपणे आढळून येत नाही. दरवर्षी 1 दशलक्ष लोकांपैकी 5 ते 30 लोकं याने ग्रस्त होतात आणि ही स्थिती बहुधा वयस्कर पुरूषांमध्ये आढळते. एओरटिक डायसेक्शन ने ग्रस्त असलेल्या प्रत्येकाला त्रासदायक व अचानक वेदना होतात. इतर लक्षणांमध्ये श्वसनाचा त्रास,बोलण्यात अचानक अडथळा,दृष्टी जाणे,शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवणे किंवा पक्षाघात होणे. चालण्यामध्ये त्रास किंवा सतत पाय दुखणे यांचा समावेश आहे.व्हॅस्क्युलर सर्जन डॉ.धनेश कामेरकर म्हणाले , एओरटिक डायसेक्शन स्थितीचे निदान करण्यासाठी उच्च पातळीवरची अचुकता गरजेची असते, तत्पर निदान हे महत्त्वाचे असते.  ही स्थिती जरी दुर्मिळ असली तरी वेळेवर उपचार न केल्यास यामुळे मृत्युचा धोका बळावतो किंवा मेंदूशी निगडीत आजार देखील होऊ शकतात.रेडिओलॉजिस्ट डॉ.राहुल सेठ म्हणाले , एओरटिक डायसेक्शन या स्थितीवर उपचारासाठी दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. पहिली म्हणजे पारंपरिक तंत्राद्वारे ओपन हार्ट शस्त्रक्रिया तर दुसरीकडे कमीत कमी छेद असलेली व प्रभावी अशी एंडोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रिया. एंडोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला अनेक फायदे होऊ शकतात. कमीत कमी छेद वापरल्याने रूग्ण लवकर बरा होऊ शकतो,हॉस्पिटलमधील कालावधी अधिक कमी होऊ शकतो,मृत्यू किंवा रोगग्रस्त स्थितीचे प्रमाण कमी होऊ शकते आणि जखमेची खूण राहत नाही. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHeart Attackहृदयविकाराचा झटकाdoctorडॉक्टर