फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) च्या 1971-73 च्या अभिनय अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थिनी शबाना आझमी यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी आॅनलाइन संवाद साधला. याप्रसंगी एफटीआयआयचे अध्यक्ष शेखर कपूर उपस्थित होते. एफटीआयआयमधील विद्यार्थी आणि अभिनेत्री असा प्रवास त्यांनी उलगडला.
त्या म्हणाल्या, मला आठवतंय की मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजच्या बाहेर पहिल्यांदाच गावात प्रवेश केला. तेव्हा पहिल्यांदा शहरी वातावरणात वाढलेल्या एका मुलीने ‘अंकुर’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने पहिल्यांदा गावात पाऊल टाकले आणि या चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. चित्रपट हे एक जिवंत, जीवनासाठी महत्त्वपूर्ण आणि संवादात्मक माध्यम आहे. या एफटीआयआयमधील शिक्षक रोशन तनेजा यांच्या शिकवणीचा विद्यार्थिनी म्हणून माझ्या प्रतिभेवर खोलवर परिणाम झाला. चित्रपट दिग्दर्शकाचे, थिएटर अभिनेत्याचे आणि मालिका लेखकांचे माध्यम म्हटले जाते. पण सध्याच्या वेबसीरिजमध्ये दिग्दर्शक सतत बदलत राहतात. त्यामुळे एखाद्या कलाकाराला अस्वस्थता येऊ शकते.
एफटीआयआयमध्ये शिकणारे विद्यार्थी भाग्यवान आहेत की ते अशा वातावरणात शिकत आहेत. जिथे उत्कृष्टता हेच ध्येय मानले जाते, अशा शब्दांत त्यांनी एफटीआयआयविषयी गौरवोद्गार काढले.
---------------------------------------