कोरोनाची दुसरी लाट गावात पसरू नये यासाठी शिरूर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीने यापूर्वीच २५ मार्च पासून स्वयंपूर्ण स्फूर्तीने गावात कडकडीत बंद पुकारले होते त्याला ग्रामस्थांचे पूर्णपणे सहकार्य मिळाले होते. सद्यस्थिती ग्रामपंचायती मार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून मिशन ब्रेक द जैनच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
आरोग्य खात्याच्या सहकार्याने गावातच लसीकरण केंद्र, सॅनीटायझरचा वापर, मास न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गृह विलगीकरण यावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील तलाठी कोतवाल व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
--
चौकट
व्यवसायिकांची झाली कोंडी
शहरी भागाप्रमाणेच गाव पातळीवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करणे शक्य नसल्याने स्थानिक प्रशासनावर सर्वस्वी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कारवाईच्या धास्तीने नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. मात्र रोजंदारी ने काम करणाऱ्या सामान्य व गरीब लोकांची यामुळे मोठी कोंडी झाली आहे. शेती व त्यासंबंधी उद्योगांना सुट्टी असली तरी या दिवसात शेतीची कामे मात्र खोळंबत आहेत. गावातील कापड दुकान, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी, हार्डवेअर, सराफ, सुतारकाम, लोहारकाम, कुंभारकाम, चांभारकाम, इलेक्ट्रॉनिक्स दुकान व्यवसाय पूर्णपणे बंद झाले आहे. त्यांच्यावर आधारित लोकांची पुरती कोंडी झाली आहे.
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी चिंचोली मोराची येथील उद्योगपती केरू नाणेकर यांनी केली आहे.
--
फोटो क्रमांक : १७ कान्हूरमेसाई लॉकडाऊन
फोटो ओळी : कान्हूरमेसाई ता शिरूर येथील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद ठेवण्यात आलेले दिसत आहे.