लोकमत न्यूज नेटवर्कयेरवडा : तरुण-तरुणींसाठी गुणवत्तापूर्ण उद्योजकतेच्या, कौशल्यविकासाच्या संधी खुल्या करून देणारे केंद्र म्हणून येरवडा येथील ‘लाइट हाऊस’ हा प्रकल्प ओळखला जात असून, पुणे महापालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या प्रकल्पाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरात सुमारे ५०० हून अधिक शिक्षित युवक-युवतींनी या प्रकल्पाचा लाभ घेतला आहे.येरवडा येथील गुंजन चौकात विमानतळ मार्गावर क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे ई-लर्निंग स्कूलच्या आवारात हा प्रकल्प सुरू आहे. आपली स्वप्नं, आपल्याला अस्वस्थ करणारे प्रश्न मोकळेपणाने मांडण्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, दिशा दर्शविणारी कार्यशाळा, तज्ज्ञ समुपदेशकांच्या मदतीने आपल्याला नक्की काय करायला आवडेल हे समजून घेण्याची संधी, आपण शिक्षण घेत असलेल्या क्षेत्रात शिकाऊ उमेदवारी करण्याची संधी, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आॅनलाइन कोर्सेस करण्याची संधी, आपल्या आवडीचा विषय निवडून आपल्या वस्तीत सामाजिक काम करण्याची संधी... असे अनेक फायदे या प्रकल्पातून येरवडा आणि परिसरातील युवक-युवतींना होत आहेत.
कौशल्यविकासाचे ‘लाइट हाऊस’
By admin | Published: June 26, 2017 3:57 AM