खरिपाच्या पिकांना जीवदान- शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खुशी
भोर तालुक्यातील सर्वच परिसरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. पावसामुळे खरिपातील सुकून चाललेल्या पिकांना जीवदान मिळाले असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.
भातशेतीचे आगार असलेल्या या परिसरात मागील महिनाभर पावसाने दडी मारल्याने व खरिपातील जोमात आलेली पिके सुकून जाऊ लागली होती. मात्र गुरुवारी पावसाने सकाळपासूनच हलक्या सरींसह हजेरी लावल्याने सुकून गेलेल्या पिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. भातलावणीसाठी पुरेसे पाणी नसल्याने अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. पावसाने हलक्या स्वरूपात सुरुवात केल्याने पावसाच्या हजेरीने पिकांना व भातशेतीस नवसंजीवनी मिळाली आहे, असे महुडे येथील प्रगतशील शेतकरी भिकोबा गायकवाड व रवींद्र बांदल यांनी सांगितले.
पावसाच्या हजेरीने शेतात पाणी