पुणे : थंडीमुळे कलिंगडाच्या भावात घट झाली असून बोरे आणि लिंबाच्या दरात वाढ झाली. तर अननस, संत्रा, मोसंबी, सिताफळ, खरबूज, पपई, चिक्कू आणि डाळींबाचे दर रविवारी स्थिर होते़
गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबांची आवक घटली आहे. मात्र,लिंबाची मागणी असल्यामुळे गोणीमागे वीस ते तीस रुपयांची वाढ झाली आहे़ रविवारी दोन ते अडीच हजार गोणींची लिंबांची आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गुलटेकडी येथील फळ बाजारात रविवारी केरळ येथून अननस ४ ट्रक, मोसंबी ४० ते ५० टन, संत्री ३० ते ३५ टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई २० ते ३० टेम्पो, चिक्कू १ हजार गोणी, कलिंगड १० ते १५ टेम्पो, खरबुजाची १५ ते २० टेम्पो, सिताफळ १० ते २० टन, बोरे ७०० ते ८०० गोणी एवढी आवक झाली.