पुणे : महापालिकेच्या शाळांचं कंटाळवाणं, अस्वच्छ, जुनाट रूपडं बदलून सरकारी शाळांमध्येदेखील प्रसन्न रंगांच्या भिंती, प्रोजेक्टर आणि स्क्रीन, आधुनिक पद्धतीचे फायबर बेंच आणि डेस्क अशा ‘स्मार्ट क्लासरूम्स’ आणि खासगी शाळांच्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने दिल्लीच्या धर्तीवर शहरात काही शाळा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या वतीने दर वर्षी शाळांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो; परंतु या सरकारी शाळांचा दर्जा, परिस्थिती काही सुधारत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच महापालिकेच्या वतीने काही प्रशासकीय अधिकारी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चार दिवसांच्या दिल्ली दौºयावर पाठविले होते. अधिकाºयांच्या या दिल्ली दौºयानंतर पुणे शहरातदेखील महापालिकेच्या शाळांमध्ये बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात चार-पाच शाळांना दिल्लीच्या धर्तीवर ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व सविस्तर अहवाल अधिकाºयांनी आयुक्तांना सादर केला आहे.
दिल्ली सरकारने सर्व सरकारी शाळांचे रूपच बदलून टाकले आहे. यामध्ये अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद शिक्षणावर खर्च करून शाळांचे वातावरण व गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्व मॉडेल स्कूलमध्ये स्मार्ट क्लासरूम सुरू करणे, शाळांमध्ये अद्यायावत स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, नवीन इमारतीचे बांधकाम, देखभाल-दुरुस्ती व अन्य सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळांसाठी स्वतंत्र ‘इस्टेट मॅनेजर’ पदाची निर्मिती करण्यात आली. यामध्ये अनेक निवृत्त लष्करी अधिकाºयांचा सामावेश करण्यात आला आहे. शाळांमधले शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम देण्यात आले आहे. दिल्ली सरकारच्या या मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्याचा विचार करून अद्ययावत जिम, स्विमिंग पूल, एसी हॉल अशा अनेक सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय, शिक्षकांची गुणवत्ता वाठविण्यासाठी अनेक शिक्षकांना देश-विदेशातील उत्तमोत्तम शाळांत प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते. गेल्या तीन वर्षांत दिल्ली सरकारने शिक्षकांना फिनलँड, सिंगापूर, आॅक्सफर्ड अशा ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. याच धर्तीवर पुणे महापालिका पहिल्या टप्प्यात किमान पाच शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करील, असे सूत्रांनी सांगितले.आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे मॉडेलमहापालिकेच्या वतीने काही अधिकाºयांना दिल्ली सरकारने विकसित केलेल्या शाळांची पाहणी व अभ्यास दौºयासाठी पाठविण्यात आले होते. या ४-५ दिवसांच्या दौºयात सरकारने शाळांमध्ये केलेले बदल, नवनवीन उपक्रम, सर्वांची माहिती घेण्यात आली. दौºयाचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात आला असून, पुणे शहरातदेखील याच धर्तीवर काही शाळा विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.-शिवाजी दौंडकर, मुख्य कामगार अधिकारी