शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

‘मेक इन इंडिया’चा सिंह‘नाद’

By admin | Published: April 14, 2015 11:43 PM

‘चांगले काही व्हायचे असले तर ते होऊनच जाते, मग आव्हान किती का मोठे असेना.’ - संगीतकार अजय-अतुल ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते.

पराग पोतदार ल्ल पुणे‘चांगले काही व्हायचे असले तर ते होऊनच जाते, मग आव्हान किती का मोठे असेना.’ - संगीतकार अजय-अतुल ‘लोकमत’शी बोलताना सांगत होते.जर्मनीमध्ये भारताच्या ‘मेक इन इंडिया’चा डंका किती जोराने वाजला, हे साऱ्या जगाने पाहिलं. ढोल-ताशे, हलग्या^^- तुताऱ्यांच्या जल्लोषात नव्या भारताच्या ताकदीचे ते सादरीकरण पाहताना शिस्तीतला जर्मनीकरही त्याचे ‘एटीकेट्स’ विसरला आणि चक्क शिट्ट्या, आरोळ््या मारू लागला. संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सादरीकरणाला संगीत होते अजय-अतुल यांचे!सध्या नेटिझन्समध्ये कौतुकाचा विषय ठरलेली ही म्युझिक कँपेन अवघ्या १० दिवसांत तयार झाली. हा प्रवास जय-अतुल यांच्यासाठी संस्मरणीय ठरला आहे.विझक्राफ्ट या कंपनीच्या वतीने पंतप्रधानांच्या मेक इन इंडियासाठी एक म्युझिकल कँपेन करण्याची जबाबदारी अजय-अतुलवर सोपवण्यात आली, तेव्हा दोघेही आधीच लांबलेल्या डेडलाइन्सशी झगडत होते. एका बाजूला चित्रपटांचे शेड्युल लागलेले, पण त्याचवेळी थेट पंतप्रधान कार्यालयाचे निमंत्रण! आंतरराट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करायची संधी आहे; पण वेळेची कसरत अशा द्विधा मन:स्थितीत दोघे सापडले. त्यांनी नकाराची तयारी केली तेव्हा विझक्राफ्टने थेट पंतप्रधानांनी मंजूर केलेले पीपीटी प्रेझेंटेशनच समोर ठेवले. त्यावर संगीत संयोजनासाठी नाव होते अजय- अतुल! आता आली का पंचाईत?1जेमतेम १० दिवसांत काय, कसे करावे याची आखणी, मांडणी, नियोजन सुरू झाले.2प्रेझेंटेशनमध्ये भारतीय शास्त्रीय नृत्याचे सारे क्लासिकल फॉर्म दिसणार होते. मणिपुरी, ओडिसी, मोहिनीअट्टम, कथ्थकली, भरतनाट्यम् हे सारे क्लासिकल प्रकार समजून घेत त्यांना संगीत देणं ही कसरत होती.3त्यात कोरिओग्राफर बाई राजस्थानमध्ये शूटिंगमध्ये अडकलेल्या. त्यांना फोनची रेंजच नसायची. मग तुकड्या तुकड्यात त्या सूचना करायच्या. त्या बरहुकूम संगीत आकाराला येऊ लागले.4भारतीय माणूस ज्या ज्या गोष्टींचा महोत्सव करतो ते ते सारे दिसायला हवे होते आणि त्यासाठी तसेच साजेसे संगीत हवे होते.5बघता बघता मातीतले संगीत उसळून आले. ताशे, हलग्या, तुताऱ्या आणि बरेच़़़ संपूर्ण भारतीय संस्कृतीचे मिळून एक चक्र तयार होते आणि त्यातून ‘मेक इन इंडिया’चे बोधचिन्ह असलेला सिंह बाहेर येतो़ हे तंत्रज्ञानाच्या मदतीने अ‍ॅनिमेशनद्वारे दाखवले गेले, हा खरा अभिमानाचा क्षण. त्याक्षणी वंदे मातरम्ची धून वाजू लागते, हा असतो क्लायमॅक्स. 6हे सारे परवा जर्मनीने अनुभवले आणि आता कदाचित जिथे जिथे भारत मेक इन इंडिया नेईल तिथे तिथे ते पोहोचेल. 7अवघ्या १० दिवसांत दिलेले हे फँड्रीनंतरचे सर्वात वेगवान संगीत; तरीही उत्तम.8मेक इन इंडियाचा सिंह अवतरताना त्या मागचा ‘नाद’ मराठमोळा आहे याची नोंद घ्यायला हवीच.जर्मनीसारख्या देशात जिथे भारतीय पथकाचा सारा संवाद हा दुभाष्यांच्या मदतीनेच होत होता, तिथे संगीत मात्र ताकदीने पोहोचले. त्यामुळे आम्हाला हे लक्षात आले की संगीताची ताकद केवढी मोठी आहे. उद्या हॉलीवूडमध्ये संगीत द्यायची वेळ आली तरी आम्हाला आता भीती वाटणार नाही हे नक्की; कारण संगीताला भाषा नसते.- अजय-अतुल