पुणे : शहरात विविध अवैध धंदे राेजराेसपणे सुरु असतात. जुगार, मटका, गावठी दारुची विक्री अशा गाेष्टी शहरातील अनेक ठिकाणी सुरु असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच अशा ठिकाणी माेठ्याप्रमाणावर गुन्हे देखील घडत असल्याने अशा ठिकाणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने हाेत असते. यावर उपाय म्हणून आता पुणे पाेलिसांच्या वेबसाईटवर शहरातील विविध भागांमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांची यादी तयार करण्यात आली असून या ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास पाेलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवणार असल्याचेही पाेलिसांकडून सांगण्यात आले आहे.
शहरात विविध ठिकाणी अवैध धंदे सुरु असून त्याचा नागरिकांना त्रास हाेत असल्याची बातमी लाेकमतने प्रकाशित केली हाेती. यात अनेक पाेलीस कर्मचारी या धंद्यांवर कारवाई करत नसल्याचे तसेच वेळाेवेळी हप्ते घेत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले हाेते. त्यावर अवैध ठिकाणांबाबतची माहिती पुणे पाेलिसांच्या वेबसाईटवर लवकरात लवकर टाकणार असल्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले हाेते. ही यादी अद्याप वेबासाईटवर पडली नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देताच तातडीने सर्व अवैध ठिकाणांची पाेलिसांनी एक यादी केली असून ती वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. या ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्यास पाेलिसांना संपर्क करण्याचे आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
पुणे शहरात जवळपास दीड हजार अवैध धंदे सुरु असल्याचे समाेर आले आहे. पुण्यात वर्षभरात 9 डिसेंबर पर्यंत 435 जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या काळात दारुबंद कायद्यांन्वये 996 कारवाया करण्यात आल्या आहेत. केवळ पाेलिसांनी केलेल्या कारवाया लक्षात घेतल्या तर पुण्यात जवळपास दीड हजार अवैध धंदे सुरु असल्याचे दिसून येते. याव्यतिररिक्त विविध लाॅजेस, पंचतारांकीत हाॅटेलमध्ये बड्या हस्तींचा जुगार अड्डा जमताे ताे वेगळाच