पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसचा उमेदवाराचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मात्र, कॉंग्रेसतर्फे इच्छुक असलेल्या तिघा उमेदवारांच्या वतीने चार अर्ज निवडणूक कार्यालयातून नेण्यात आले आहेत. तर, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या वतीनेही उमेदवारी अर्ज नेला आहे. या मतदारसंघातून ४९ जणांनी अर्ज घेतले असल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. बारामती मतदारसंघातून ५४ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले. पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज देण्यास गुरुवारपासून (दि. २८) सुरुवात झाली. पुणे लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करीत गिरीष बापट यांनी उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र, कॉंग्रेसला अजूनही आपला उमेदवार ठरविता आलेला नाही. कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा झालेले प्रवीण गायकवाड यांच्या वतीने उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे. कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज नेल्याची नोंद निवडणूक शाखेकडे झाली आहे. तर, आणखी एक चचेर्तील उमेदवार अरविंद शिंदे यांच्या वतीने देखील उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे प्रक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र, मनसेच्या सुहास निम्हण यांच्या वतीने उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या अनिल जाधव यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत ४९ उमेदवारांनी अथवा त्यांच्या वतीने ८० अर्ज नेण्यात आले आहेत. यातील २५ जणांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतले आहेत. बारामतील लोकसभा मतदारसंघात गेल्या ५४ जणांनी अर्ज घेतले आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांनी शुक्रवारीच अर्ज नेले आहेत. शुक्रवारी सोळा जणांनी अर्ज नेले असून, त्यात ९ अपक्ष इच्छुक उमेदवारांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या अजित पानसरे यांच्या वतीने उमेदवारी अर्ज नेला आहे. -------------------
ऐकावं ते नवलच..! पुण्यात काँग्रेसच्या ‘एका’ जागेसाठी तिघांनी बांधले बाशिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 8:25 PM
पुणे लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट करीत गिरीष बापट यांनी उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र, कॉंग्रेसला अजूनही आपला उमेदवार ठरविता आलेला नाही.
ठळक मुद्देगायकवाड, छाजेड, शिंदे यांनी घेतले अर्ज पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात