शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

Pune Rain: हिटपासून पुणेकरांना थोडाफार दिलासा; दुपारी अचानक पावसाची जोरदार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:37 PM

सोमवारी कामासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची अचानक दाखल झालेल्या पावसामुळे चांगलीच धांदल उडाली.

पुणे : माॅन्सून आता परतीच्या प्रवासाला निघाला असून, पुणे शहरात रविवारी (दि. २२) रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आणि रात्री पावणेदहा वाजता अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाला. आज मात्र सकाळापासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. अखेर दुपारी १२ च्या सुमारास मुसलदाहर पावसाला सुरुवात झाली. सोमवारी कामासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची अचानक दाखल झालेल्या पावसामुळे  चांगलीच धांदल उडाली. 

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस गायबच झाला होता; पण रविवारी रात्री परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागांतून नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी अनुकूल वातावरण आहे. या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. २३ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थान व कच्छच्या काही भागांतून नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या परतीसाठी अनुकूल वातावरण असणार आहे. रविवारी राज्यात अनेक भागांत पाऊस झाला. तसेच येत्या दोन दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांत, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तर कोकण विभागांमध्येही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २३ ते २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात, तर २३ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व कोकण गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे, तर २४ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस होईल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

पुण्यात जोरदार हजेरी...

पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस गायब होता. तापमानातदेखील वाढ झाली होती. त्यामुळे चांगलीच उष्णता वाढली होती. रविवारी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट पुणेकरांना अनुभवायला आला. आताही तेच झाले असून काही मिनिटांमध्येच रस्त्यांवरून पाणी वाहताना दिसून आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसenvironmentपर्यावरणNatureनिसर्गWaterपाणीTemperatureतापमान