बारामती : एके काळी अस्पृश्य ठरवून गावकुसाबाहेर, हगणदरीजवळ राहायला भाग पाडण्यात आलेल्या समाजसमूहांपैकी अनेक समूहआजही तशाच अवस्थेत जगत आहेत. काळाच्या कसोटीवर त्यांची ना त्या प्रमाणात प्रगती झाली, ना जीवनस्तर सुधारला. त्यांच्या नशिबी आजही गावकुसाबाहेरचेच जगणे आहे. याचाच प्रत्यय बारामतीमधील लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनगरमध्ये येतो आहे.अस्वच्छता, अपुरी स्वच्छतागृहे, जागोजाग पसरलेली दुर्गंधी आणि अनारोग्याचा फैलाव अशी दयनीय अवस्था येथील कष्टकऱ्यांच्या नशिबी आजही असल्याचे चित्र आहे. याकडे उदासीन राजकारणी आणि प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. शहरातील अण्णा भाऊ साठेनगर येथील २ हजार लोकसंख्येसाठी केवळ १० स्वच्छतागृहे आहेत. तर लहान मुलांसाठी असणारे ‘खुले स्वच्छतागृह’ दुर्गंधीला कारणीभूत ठरत आहे. नगरपालिकेने यावर उपाययोजना केल्यास परीसरातील चित्र बदलण्यास मदत होईल. बारामतीत प्रवेश करताच दिसणाºया अण्णा भाऊ साठेनगरची अवस्था वाईट आहे.येथे हौसिंग सोसायटीची स्थापना १९५६मध्ये झाली आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून त्या वेळी सोसायटीने ३४ घरे बांधूनदिली होती; पण आता त्या घरांची अवस्था फार वाईट झाली आहे. ही घरे पूर्णपणे जीर्ण झाली आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. एखाद्या जोराच्या पावसात येथे अपघात होण्याची भीती आहे. घर म्हणून पत्र्याच्या शेडमध्ये लोक राहतात. स्वच्छतेच्या बाबतीतदेखील येथील परिस्थिती वाईट आहे.लहान मुलांचे आरोग्य आले धोक्यातयेथील लोकवस्ती २ हजारांपेक्षा अधिक आहे; पण येथे पुरुषांना ५ आणि महिलांना ५ अशी स्वच्छतागृहे आहेत. अपुºया स्वच्छतागृहांमुळे अनेकांना उघड्यावर शौचाला जावे लागते. या वस्तीत असणारे लहान मुलांचे खुले स्वच्छतागृह केवळ येथेच पाहायला मिळते.या स्वच्छतागृहाला छत नाही, बाजूला भिंती नाहीत. मुलांना नाक दाबून स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. मागील वर्षी येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधींच्या नावाने फलक लावून नाराजी व्यक्त केली होती. काँक्रिटीकरण झाले; पण ठराविक ठिकाणीच. सत्ताधारी फक्त आश्वासन देतात. मात्र, अद्यापपर्यंत परीस्थिती ‘जैसे थे’ आहे.
...‘जगणे’ अद्यापही गावकुसाबाहेरचेच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:11 PM