श्रीकिशन काळे।पुणे : जुनी झाडे वाचविण्यासाठी प्रति झाड अनुदान देण्याची योजना लवकरच राज्यभरात जाहीर केली जाणार आहे. यात एक जुने झाड जगविल्यास शेतकºयाला वर्षाला हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. पुढील आठवड्यात बैठकीनंतर ही योजना जाहीर केली जाईल.
शेतात असलेल्या झाडांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या समितीने अहवाल दिला असून येत्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यासंदर्भात वन विभागाची बैठक घेणार असल्याची माहिती वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष अभिमन्यू काळे यांनी दिली.
अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात संबंधित विभागांना पत्र पाठवून बैठकीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना गोंदिया जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये काळे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून राबविली होती. या नावीन्यपूर्ण योजनेला यश मिळाले. शेतात १०० सें.मी. घेर असणाºया झाडांना प्रति झाड१०० रुपये तर ३०० सें.मी.पेक्षाजास्त घेर असणाºया झाडांनाप्रति झाड एक हजार रुपयेअनुदान शेतकºयांना देण्याचेस्वरूप होते. हीच योजनाआता राज्यभर राबविली जाणारआहे.गावातील वृक्षांनाही ही योजना लागू करावी, अशी शिफारस आहे. नवीन झाडे लावायला खूप खर्च येतो. पण जुन्या झाडांना काहीच खर्च नसतो. त्याचे जतन व्हायला हवे. म्हणून ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.- अभिमन्यू काळे,तत्कालीन जिल्हाधिकारी, गोंदियाजुन्या झाडांच्या बिया जतन करून लावल्या तर त्याचे झाड चांगले येते. कारण ते पूर्वी चांगल्या वातावरणात वाढलेले असते. अशा जुन्या झाडांचा सर्व्हे राज्यभर सुरू आहे. झाडे किती आणि त्यासाठी किती अनुदान लागेल, याचा अंदाज या माध्यमातून घेतला जात आहे.- रघुनाथ नाइकडे, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे विभाग