पुणे : मेंदू मृत झालेल्या २४ वर्षीय तरुणाच्या यकृतदानामुळे ५४ वर्षीय रुग्णाला जीवनदान मिळाले आहे. डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये ही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरुणावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान मेंदू मृत घोषित करण्यात आला. नातेवाईकांच्या समुपदेशनानंतर नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.याबाबत माहिती मिळाल्यानंतर सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने शनिवारी दुपारी तरुणाचे यकृत काढून पुण्यात आणले. त्यासाठी कोल्हापूर ते पुणे या मार्गावर ग्रीनकॉरिडॉर करण्यात आला होता.यकृत प्रत्यारोपण व हेपॅटॉबिलिअरी सर्जन डॉ. बिपीन विभूते, डॉ दिनेश झिरपे, डॉ. अनिरुद्ध भोसले, भूलतज्ज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. मनोज राऊत, क्लीनिशिअन डॉ. अभिजित माने, प्रत्यारोपण समन्वयक राहुल तांबे व अरुण अशोकाने, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये यांनी प्रत्यारोपणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.>प्रत्यारोपण आवश्यकसह्याद्रीमध्ये दाखल झालेल्या भोसरी येथील ५४ वर्षीय रुग्णाच्या दोन्ही किडन्यांवर सूज आली होती.लिव्हर सिरॉसिस या आजारामुळे तातडीने यकृत प्रत्यारोपण करणेगरजेचे होते. यकृतदानामुळेया रुग्णाला जीवनदानमिळाले आहे.
यकृतदानामुळे रुग्णाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 1:34 AM