शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

वीस जणांच्या कंठाशी आलेले प्राण, पोलिसांमुळे मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पौड रोडवरील कृष्णा हॉस्पिटलमध्ये २० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. येथील ऑक्सिजन संपत आला होता, ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पौड रोडवरील कृष्णा हॉस्पिटलमध्ये २० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. येथील ऑक्सिजन संपत आला होता, ही आणिबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन कोथरुड पोलिसांनी रुग्णालयांशी संपर्क साधून एका तासाभरात ऑक्सिजनचे ४ जम्बो सिलेंडर उपलब्ध करुन दिले. त्यामुळे ऑक्सिजनअभावी कंठाशी प्राण आलेल्या २० रुग्णांना जीवदान मिळू शकले.

कृष्णा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मेघश्याम डांगे यांना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता फोनवरुन माहिती देण्यात आली. त्यात रुग्णालयातील २० रुग्ण ऑक्सिजनवर असून त्यांचा ऑक्सिजनचा साठा संपला असून केवळ ३० ते ४५ मिनिटे पुरेल, इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक असून आहे. कोठेही जागा नसल्याने रुग्णांना हलविणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. ही आणिबाणीची स्थिती लक्षात घेऊन कोथरुड पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार कोथरुड परिसरातील सर्व हॉस्पिटलशी संपर्क साधू लागले. त्यात सूर्यप्रभा रुग्णालय व सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून ऑक्सिजन मिळू शकेल, असे दिसून आले. त्याबरोबर पोलिसांनी तातडीने क्रेन व शिवाजीनगर येथून ड्युरा सिलेंडर आणण्याकरीता वाहन उपलब्ध करुन देण्यात आले. या वाहनांना पोलीस एक्सॉर्ट व पायलेटिंग करुन केवळ १ तासाचे आत हे ऑक्सिजन सिलेंडर कृष्णा हॉस्पिटलमध्ये पोहचवले. त्यामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये होणार्‍या संभाव्य दुर्घटनेपासून रुग्णांचा बचाव करता आला.

पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली व सह्याद्री व सूर्यप्रभा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे कोथरुड पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली.