नारायणगाव : ट्रक खरेदी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया शाखा, नारायणगाव यांच्याकडे खोटी कागदपत्रे सादर करून १४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या सुधीर बाळकृष्ण मुरादे (रा़ रोहकडी, ओतूर, ता. जुन्नर) व ट्रकचे कोटेशन देणारे श्री बालाजी एंटरप्रायजेस साई कॉम्प्लेक्स ओतूरचे प्रोप्रायटर आशिष दत्तात्रय गटकळ यांच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेतील वरिष्ठ व्यवस्थापक श्रीपाद नाझरकर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक नाझरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर मुरादे यांनी बँक आॅफ इंडिया शाखा, नारायणगाव येथे दि़ २१/१०/२०१५ रोजी ट्रकखरेदीसाठी कर्ज प्रकरण केले होते़ त्यासाठी लागणाºया सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याने बँकेने त्यांना १४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले होते़ कर्ज प्रकरणासाठी श्री बालाजी एंटरप्रायजेस साई कॉम्प्लेक्स ओतूरचे प्रोप्रा़ आशिष दत्तात्रय गटकळ यांनी कोटेशन दिले होते़ त्यानुसार मंजूर रक्कम श्री बालाजी एंटरप्रायजेस यांना आऱ.टी.जी़ एस़ द्वारे हस्तांतरित करण्यात आली होती.बालाजी एंटरप्रायजेसकडून टॅक्स इनव्हाइस पावती बँकेकडे जमा केली; मात्र बँकेला त्यांनी ट्रक दाखविला नाही़ तसेच आऱ सी़ बुकची वारंवार मागणी केल्यानंतरही आऱ सी़ बुक आलेले नसल्याचे कारण सांगून ते बँकेकडे जमा केले नाही. कर्जदार सुधीर मुरादे यांनी जुलै २०१८ पर्यंत घेतलेल्या कर्ज रकमेपोटी ११ लाख ४५ हजार रुपयांचे नियमित हप्ते भरले. उर्वरित रकमेपैकी ७ लाख १५ हजार २३३ रुपये व जुलै २०१८ पासूनचे बँकेचे व्याज न भरल्याने बँकेने आर.जे़ एंटरप्रायजेस या वसुली एजन्सीला ट्रक जप्त करण्यास सांगितले; मात्र मुरादे यांच्याकडे कोणताही ट्रक नसल्याचे वसुली एजन्सीस आढळून आले.बँकेकडे सादर केलेले इंजिन व चासीज नंबर, आर टी़ पासिंग नंबर तसेच नाव, पत्ता मिळणेकामी प्रादेशिक परिवहन विभाग पिंपरी-चिंचवड यांच्याकडे चौकशी केली असता, सदरचा इंजिन व चासीज नंबर व ट्रक विक्रम सुभाष घुले यांच्या नावावर असल्याचे आढळून आले़ अखेर फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत़ संबंधित घटनेबाबत नारायणगाव परिसरात चर्चा होत आहे.कर्ज घेऊनही ट्रकची खरेदीच नाहीट्रकखरेदीसाठी कर्ज प्रकरण केले होते़ कागदपत्रांची पूर्तता केल्याने बँकेने १४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले होते़ श्री बालाजी एंटरप्रायजेस ने कोटेशन दिले होते़ त्यानुसार बालाजी एंटरप्रायजेसकडून टॅक्स इनव्हाइस पावती बँकेकडे जमा केली; मात्र बँकेला ट्रक दाखविला नाही़ तसेच आऱ सी़ बुक आलेले नसल्याचे कारण सांगून तेही बँकेकडे जमा केले नाही. कर्जदार मुरादे यांनी जुलै २०१८ पर्यंत कर्ज रकमेपोटी ११ लाख ४५ हजार रुपयांचे नियमित हप्ते भरले़ जुलै २०१८ पासूनचे बँकेचे व्याज न भरल्याने बँकेने आर.जे़ एंटरप्रायजेस या वसुली एजन्सीला ट्रक जप्त करण्यास सांगितले; मात्र मुरादे यांच्याकडे कोणताही ट्रक नसल्याचे वसुली एजन्सीस आढळून आले़
खोटी कागदपत्रे सादर करून कर्जाची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:45 AM