लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दीड वर्षापासून पुणे-लोकल सेवा सामान्य प्रवाशांकरिता बंद आहे. त्यामुळे रोज जवळपास ८० हजार प्रवाशांना लोकलअभावी खासगी वाहने, ‘एसटी’ने प्रवास करावा लागत आहे. त्याचा खर्चही अधिक आहे. शिवाय वेळही जास्त लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लोकल सेवेवरचे निर्बंध हटवून सामान्य प्रवाशांनादेखील प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवासी करीत आहे.
कोविडपूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान लोकलच्या ४२ फेऱ्या होत होत्या. त्या आता केवळ चारच होत आहे. ते देखील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिताच. पुणे-लोणावळा दरम्यान पूर्वी जवळपास ८० हजार प्रवास करीत होते. ते सर्व प्रवासी आता खासगी वाहने तसेच एसटीने प्रवास करीत आहे. लोकलसाठी प्रवाशांना केवळ १५ रुपये मोजावे लागत. आता मात्र त्यांना प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे.
कोट १
राज्य सरकारच्या निर्देशानुसार रेल्वेने लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यास प्रवासाची मुभा दिली आहे. सरकारने हे निर्बंध हटविल्यास रेल्वे प्रशासन सामान्यासाठी देखील प्रवास करण्यास परवानगी देईल.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे
कोट २
सरकारने लोकल सेवेवर लावलेले निर्बंध आता हटविले पाहिजे. ज्या प्रवाशांचे लसीकरण झाले आहे. त्यांना प्रवास करण्यास मंजुरी दिली पाहिजे. खासगी वाहनांने प्रवास करणे सामान्यांना परवडत नाही. लोकल सेवा सामन्यासाठी सुरू झाली तर अनेकांचे प्रश्न सुटतील.
-हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप, पुणे