पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये लगतच्या भागातून दररोज ये-जा करणारे नोकरदार, कामगार, व्यावसायिकांची संख्या खुप मोठी आहे. लॉकडाऊनपुर्वी त्यांना लोकल व पॅसेंजरचा आधार होता. त्याचे तिकीट दर कमी असल्याने हा प्रवास परवडत होता. पण लॉकडाऊननंतर ही सेवा अद्याप ठप्प असल्याने त्यांना खासगी वाहन, पीएमपी, एसटी आदी पर्यायांचाच आधार आहे. पण लांबपल्ल्याच्या प्रवासांसाठी हे पर्याय महागडे ठरत आहेत. लोणावळा लोकल व दौंड डेमु गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. तसेच पॅसेंजर गाड्याही भरून धावत होत्या. पण अनलॉकमध्ये रेल्वे सुरू करताना केवळ एक्सप्रेस गाड्यांनाच प्राधान्य दिल्याचे दिसते. कोविड विशेष गाड्यांसह दिवाळी व छजपुजेच्या पार्श्वभुमीवर उत्सव गाड्या सुरू करण्यात आल्या. हा गाड्यांची मुदत सातत्याने वाढविली जात आहे. मात्र. लोकल व पॅसेंजर गाड्यांबाबत राज्य शासन उदासीन आहे.
--------------
धावत असलेल्या महत्वाच्या गाड्या
पुणे स्थानकातून सध्या डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्सप्रेस यांसह हावडा, दानापूर, निझामुद्दीन अमरावती, नागपूर, अजनी, इंदौर, गोरखपुर, जयपुर, झांसी, सिंकदराबाद, मंडुआडीह, दरभंगा या लांबपल्याच्या जवळपास २५ हून अधिक एक्सप्रेस धावत आहेत. काही गाड्या उत्सव विशेष म्हणून दिवाळीपुर्वी सुरू करण्यात आल्या. त्याची मुदत सातत्याने वाढविण्यात येत आहे. या गाड्यांना आरक्षण बंधनकारक आहे.
-----------------
बंद असलेल्या लोकल व पॅसेंजर
लॉकडाऊनपुर्वी पुण्यातून दररोज सुमारे २२ लोणावळा लोकल धावत होत्या. सध्या केवळ चार फेºया सुरू असून केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच प्रवासाची अनुमती आहे. त्याव्यतिरिक्त पुण्यातून दौंड डेमु, बारामती, सातारा, कर्जत, पनवेल, मनमाड, सोलापुर आदी पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावर दैनंदिन प्रवास करणाºया प्रवाशांना खासगी वाहन किंवा एसटी बसशिवाय पर्याय नाही. त्यासाठीचा खर्च रेल्वे तिकीटापेक्षाही अधिक होत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
--------------
मुंबईसह चेन्नई व अन्य काही शहरांमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी लोकल सेवा धावत आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांचे लाड आता थांबवायला हवेत. सर्वसामान्य नागरिकांना होणाºया त्रासाचा विचार करून लोकल व पॅसेंजर सेवा सुरू करण्याची गरज आहे. अनेक नोकरदार, छोटे व्यावसायिकांना दैनंदिन प्रवासासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- हर्षा शहा, अध्यक्षा रेल्वे प्रवासी गु्रप
----------------