लाखेवाडी :लॉकडाऊनमध्येही बहुतेक भाजीपाल्यांचे किरकोळ विक्रीचे दर कमी झालेले नाहीत. उलट उन्हाळी हंगामामुळे अनेक पालेभाज्यांचे किरकोळ विक्रीचे दर तेजीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
उन्हाळी हंगामामुळे उत्पादन कमी झाल्याने शापू, चुका, पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. तसेच वांगी, घेवडा, बटाटा, मिरची यांचे दर तेजीत आहेत. तसेच इतर भाजीपाल्यांचे दर कमी न होता ते टिकून असल्याचे चित्र सध्याच्या कोरोनाच्या काळात पहावयास मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किरकोळ भाजीविक्रेत्यांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सध्या काही किरकोळ भाजीविक्रेत्यांनी व्यवसाय तात्पुरता थांबवला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सध्याच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ठोक व्यापारी हे वेगवेगळी कारणे सांगून कमी दराने भाजीपाला घेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आमचेकडून व्यापारी हे कमी दराने भाजीपाला घेत आहेत, मात्र किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर अजिबात कमी झालेले नाहीत. व्यापाऱ्यांच्या साखळीमुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर तेजीत असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याची खंत भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सध्या लॉकडाऊन असूनही बहुतेक भाजीपाल्यांचे दर तेजीत.
१२०५२०२१ बारामती—०३
———————————