शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

‘लॉकडाऊन आवडे सरकारला’...राज ठाकरेंची उद्धव-पवार सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “बाहेरच्या राज्यांमध्ये सगळे सुरु आहे. तर महाराष्ट्रात का नाही,” असा प्रश्न उपस्थित करून मनसे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “बाहेरच्या राज्यांमध्ये सगळे सुरु आहे. तर महाराष्ट्रात का नाही,” असा प्रश्न उपस्थित करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारला धारेवर धरले. “यांना लॉकडाऊन करायला काय जातंय? लॉकडाउन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे का? सरकारने सतत लॉकडाऊन वाढवत न्यायचा आणि आम्ही प्रश्नच विचारायचे नाहीत, असे होऊ शकत नाही. ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’ अशी सध्याची अवस्था झाली आहे,” अशी टीका ठाकरे यांनी केली.

गुरुवारी (दि. २९) त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लोकांचे उद्योग बंद झाले आहेत. सरकारने आता आणखी थोडी शिथिलता देण्याची गरज आहे.

“कोरोनाची साथ एकाएकी जाणार नसल्याचे जगातल्या तज्ज्ञांचे मत आहे. यापुढे आपल्याला अशा साथीबरोबरच राहण्याची सवय करून घेण्याची गरज आहे आणि त्याला धरूनच योग्य निर्णय, उपाययोजना करायला हव्यात. लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहेच, परंतु त्यासोबतच धोरण आखणीत अधिक कल्पकता दाखवायला हवी. पण दिसते असे की महाराष्ट्र सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलीकडे काही सुचत नाही,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

“महाराष्ट्र सरकारने निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीने पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसाने आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच, परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन करेल,” असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेची आगामी निवडणूक जोरदार तयारीनिशी लढवणार असून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. “महापालिकेचे अंदाजपत्रक ८ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. पण त्यातून नागरिकांना काय सुविधा मिळाल्या? एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठे गेला याची माहिती घेऊन सत्ताधारी भाजपने काय केले याची पोलखोल करा,” असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. प्रत्येक भागाची माहिती काढून ‘स्टींग ऑपरेशन’ करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

चौकट

वैयक्तिक वैर कुणाशी नाही

“माझं वैयक्तिक वैर कुणाशीही नाही. नरेंद्र मोदींच्या, अमित शाहांच्या भूमिका मला पटत नाहीत तर त्या नाही पटल्या असं सांगतो. ज्या भूमिका पटल्या त्या पटल्या असंही मी सांगितलं आहे. स्पष्ट बोलण्यात चुकीचे काय,” असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट करावी असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर ठाकरे म्हणाले, “माझ्या भूमिका स्पष्टच आहेत. परप्रांतीयांनी भूमिपुत्रांवर अतिक्रमण करू नये आणि स्थानिकांनी परप्रांतीयांवर अतिक्रमण करू नये हीच माझी भूमिका आहे.”

चौकट

राज ठाकरे म्हणाले...

-मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालये सुरू आहेत. सर्वांना घरून काम करणे शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागतो. लोकल बंद असल्याने मुंबईकरांचे आतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली; पण लोकल बंद असल्याने बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्याने रोग अधिक पसरण्याचाच धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद याने नेमके काय साध्य होणार?

चौकट

ठाकरे आणि शब्दांचे खेळ

गेल्या आठवड्यात पुरंदरे यांच्याशी काही ऐतिहासिक शब्दांबद्दल चर्चा झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. मराठीतले काही शब्द, इतिहासातले काही विशिष्ट शब्द ते तसेच का वापरावेत याबद्दल जाणून घेतल्याचेही ते म्हणाले. “त्या वेळची मराठी वेगळी होती. ‘ळ’ आणि ‘ल’ मध्ये फरक होता. किंवा ‘कैसी’ शब्दाला त्यावेळी ‘कैंचि’ असे लिहिले आहे. मग तो शब्द आत्ता वापरावा का? आपल्याला माहीत असलेले काही फारसी शब्द आहे. आडनावांच्या बाबतीतही असंच काही आहे. ‘फडणवीस’ या आडनावाचे उदाहरण देताना ते म्हणाले, “फडणवीस हे आडनाव ‘फर्दनवीस’ या पर्शियन शब्दावरून आले आहे. ‘फर्द’ म्हणजे कागद आणि ‘नवीस’ म्हणजे लिहिणारा. कागदावर लिहिणारा ‘फर्दनवीस’. पण मग नंतर ‘फडावर लिहिणं’ आलं. म्हणून ते ‘फडणवीस’ असे झाले. आडनावे अशी असतात. या गोष्टी कुठून आल्या, कशा आल्या या सगळ्या गोष्टींमध्ये मला फार रस आहे.”

चौकट

चंद्रकांत पाटील यांच्यासाठीची क्लीप

परप्रांतीयांबद्दलची मनसेची भूमिका मनसे आणि भाजपमधील युतीत अडथळा ठरत असल्याचे सांगितले जाते. त्यावर राज म्हणाले “चंद्रकांत पाटील यांनी परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यावर मी याबद्दलची माझी भूमिका स्पष्ट करणारी एक लिंक पाठवेन, असे त्यांना सांगितले. मात्र अजून तरी मी त्यांना क्लिप पाठवलेली नाही. तुम्ही त्या क्लिपवरून सूत जुळवू नका.”