लॉकडाऊन की निर्बंध ? पुण्याबाबत आज होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 10:05 AM2021-03-26T10:05:30+5:302021-03-26T10:07:13+5:30

वाढत्या रुग्ण संख्येमुळे कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता.

Lockdown restrictions? The decision regarding Pune will be taken today. | लॉकडाऊन की निर्बंध ? पुण्याबाबत आज होणार फैसला

लॉकडाऊन की निर्बंध ? पुण्याबाबत आज होणार फैसला

googlenewsNext

वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचा पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी अधिकचे निर्बंध लागणार का याचा निर्णय आज घेतला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपस्थिती मध्ये विधानभवन येथे यासंदर्भात बैठक सुरु झाली आहे. यामध्ये सध्य परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. 

पुण्यामध्ये गेले काही  सातत्याने रुग्ण संख्या वाढते आहे. त्यातच आता गंभीर रुग्णांना बेड मिळेना अशी परिस्थिती आली आहे. ही एकूण परिस्थती लक्षात घेता अधिकचे निर्बंध किंवा लोकडाऊन याचा विचार सुरु असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. दरम्यान आर्थिक घडी बिघडू नये म्हणून लोकडाऊन नको अशी भूमिका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज आढावा बैठक घेतली जात आहे. 

दरम्यान सध्या १० ला लॉक असा निर्णय घेण्यात आला तरी शहरात त्याची फारशी अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. १० नंतर देखील लोक गर्दी करत आहेत. तसेच सोशल डिस्टंसीग चे पालन देखील होताना दिसत नाहीये. त्याच पार्श्वभूमीवर आज अधिक निर्बंध की  लोकडाऊन हे ठरवलं जाईल. 

Web Title: Lockdown restrictions? The decision regarding Pune will be taken today.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.