पुणे जिल्हा सह शहरामध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.त्यामुळे अनेक व्यावसायिकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रशासनाने सावधगिरीने पावले टाकली असली तरी निर्बध माञ कडक केले आहे त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.त्याच्यात चिंतेचे वातावरण आहे.याचविषयी वाघोली परिसरातील छोटे व्यवसायिक,सामाजिक कार्यकर्ते, सर्व सामान्य नागरिक, बचत गट प्रतिनिधी,राजकीय नेते यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत.
********************
आता कुठे तरी दिवसाला पोट भरण्यापुरती कमाई होत होती.वाढत्या कोरोना मुळे कमी होऊ लागली आता पुन्हा लाॕकडाउन झाले तर आम्ही कसे जगावे, आमच्या घरच्यांना काय खायला घालावे. सरकारने आमच्यासारख्या तीन महिन्याचे रेशनद्यावे.
अर्जुन धोंगडे, चर्मकार
*******************
या कोरोनामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून आत्ता पुन्हा हे लाॕकडाऊन करू नये,महिलांच्या बचत गटातून आता कुठेतरी हप्ते भरायला सुरुवात केली होती,या बचती मधून शाळेची फी,घर भाडे व खर्च ,दवाखान्यांच्या खर्च भागविली जात असतो.
सपना.एस. वांढेकर, बचत गट अध्यक्ष
*******************
सरकारने लाॕडाऊन करू नये नियम कडक करावे आणि प्रशासनाने घरोघरी जाऊन प्रत्येकास लसीकरण करावे.लाॕकडाउन मध्ये सर्वसामान्य नागरिकांचे खूप हाल होतात त्यामुळे लाॕकडाउन करू नये पण निर्बंध कडक करावे.
-रामकृष्ण सातव पाटील,नियोजन समिती सदस्य
***********
पहील्या लाॅकडाऊन मुळे
कर्ज,व्याज,भाडे,दवाखाना,शाळा, बेरोजगारी अशा समस्येमूळे सर्वसामान्य जनता अधिच मेटाकूटीला आली आहे,त्यात हे आणखी एक लाॅकडाऊन लावणे म्हणजे जनतेच्या दुखावर मीठ चोळणे होईल,
हतावर पोट असणारी गरीब जनता आधीच कर्जबाजारी आहे त्याच्यासाठी हे आत्ताचे लाॅकडाऊन मृत्यू शिक्षेपेक्षा कमी नाही .
-शनिभाऊ शिंगारे, सामाजिक कार्यकर्ते.
******************
सर्व सामान्य नागरिकांना वर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे लॉकडाऊन करण्यास आमचा विरोध आहे
कोरोना चाचण्या वाढवणे गरजेचे आहे.रुग्णांचा शोध घेत कोरोना साखळी तोडली पाहिजे प्रशासनाकडून कागदी घोडे नाचविण्यापेक्षा कोरोनाच्या नियमांचे कोटकोरपणे पालन करण्यासाठी शक्ती करावी.
-संदीप सातव,भाजपा पदाधिकारी
*****************
कोरोना येऊन एक वर्ष पूर्ण होऊन देखील सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपायोजना आरोग्या संदर्भात झालेल्या नाहीत फक्त कागदोपत्री व जनतेला वेठीस धरण्याची काम सरकार व आरोग्य विभाकडून होत आहे.घरोघरी लसीकरण हा पर्याय आहे.
-शिवदास पवार,सामाजिक कार्यकर्ते
************
लाॕकडाउन ऐवजी कडक नियमावली गरजेची आहे.अर्थव्यवस्था रुळावर येत असताना पुन्हा लाॕकडाउन मूळे मोठा धक्का बसेल.ज्यामुळे व्यापार व्यवसाय पुन्हा ठप्प होण्याची होईल.तर यामुळे पुन्हा बेरोजगारी वाढेल.सरकारने व्हाॕक्सिनेशन मोहिम घरोघरी जाऊन राबवावी.
- नितीन जैन.आटी इंजिनियर
*******************
लॉकडाउन झाल्यामुळे व्यवसाय कमी झाला आहे त्यात घर कसे चालवायचे व गाडीचे हप्ते कसे भरायचे याचे खूप टेन्शन आहे. सरकारने कोरोना सोबत लढान्यास शिकवावं. लॉकडाऊन हा पर्याय नाही.
- गोविंद आवटे, कँब चालक
***************
कंपन्या सह मोठमोठे व्यवसाय चालू आहेत तर मोठ्या कंपन्यामध्ये अनेक कामगार पॉझिटिव असतानाही कंपन्या चालू,मग सर्व सामान्यांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय पंधरा दिवसाठी कडक लाॕकडाउन करावे व कोरोनाची साखळी तोडावी.फक्त गरीबासाठी नियम नको.
- कपिल काजळे, कंपनी कामगार
***********************
लॉकडाऊन झाले नाही पाहिजे आम्ही अठरा तास भाजीपाला विकून आमच्या घरच्यांचा उदरनिर्वाह करतो असे झाले तर आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येईल.
-बायडाबाई घागरे,भाजीपाला विक्रेती