शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

साडेतीन लाखांचा माल गोडाऊन उचकटून लंपास

By admin | Published: February 19, 2016 1:31 AM

पुणे-सासवड राज्यमार्गालगत असलेल्या एका गोडाऊनचे लोखंडी शटर उचकटून चोरट्यांनी ३ लाख ६१ हजार ३८२ रुपये किमतीचे ९८ सबमर्सिबल व सेंट्रीफ्युगल पंप चोरून नेले आहेत.

लोणी काळभोर : पुणे-सासवड राज्यमार्गालगत असलेल्या एका गोडाऊनचे लोखंडी शटर उचकटून चोरट्यांनी ३ लाख ६१ हजार ३८२ रुपये किमतीचे ९८ सबमर्सिबल व सेंट्रीफ्युगल पंप चोरून नेले आहेत.एंजल पंप प्रायव्हेट लिमिटेड राजकोट (गुजरात) कंपनीच्या वडकी (ता. हवेली) येथील गोडाउनमध्ये साठा करून ठेवण्यात आलेल्या मालाची देखभाल करणारे व कंपनीचे एजंट मनोज अरविंद पटवर्धन (रा. त्रिदेव अपार्टमेंट, मॉडर्न कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे) यांनी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गायकवाड यांचे मालकीचे १०वा मैल, वडकी (ता. हवेली) येथे गोडाउन आहे. त्यामध्ये कंपनीचे पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणारे सबमर्सिबल व सेंट्रीफ्युगल पंपसाठा करण्यात येतो. मागणीप्रमाणे त्याचे वितरण केले जाते.मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ७च्या सुमारास काम संपल्यानंतर नेहमीप्रमाणे गोडाउन बंद करण्यात आले. बुधवारी (दि. १७) सकाळी ९.४५च्या सुमारास अकाउंटंट विजय येवले हे कर्मचाऱ्यांसमवेत गोडाउन उघडण्यासाठी आले, त्या वेळी त्यांना गोडाउनचे लोखंडी शटर उचकटलेले दिसले. त्यांनी तत्काळ ही बाब पटवर्धन यांना कळवली. ते आल्यानंतर गोडाउनमध्ये ठेवण्यात आलेल्या मालाची पाहणी केली असता ३ लाख ६१ हजार ३८२ रुपये किमतीचे ९८ सबमर्सिबल व सेंट्रीफ्युगल पंप चोरून नेल्याचे त्यांना लक्षात आले. याप्रकरणी उरुळी देवाची दूरक्षेत्रात फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस हवालदार आर. एल. मोहरकर पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)