श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून मंगल थिएटर्स, पुणे या संस्थेच्या लगीन या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच मॉडर्न महाविद्यालय, पुणे या संस्थेच्या द सिक्रेट ऑफ लाईफ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाला. याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे पुणे केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:
शब्दधन सोशल फाऊंडेशन, पुणे या संस्थेच्या बैदा या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक विनोद रत्ना (नाटक-लगीन), द्वितीय पारितोषिक शुभंकर वाघोले (नाटक- द सिक्रेट ऑफ लाईफ), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक निखिल मारणे (नाटक- अग्निमंथन), द्वितीय पारितोषिक अभिप्राय कामठे (नाटक-लगीन), नेपथ्य: प्रथम पारितोषिक ऋतुजा बोढे (नाटक- लगीन), द्वितीय पारितोषिक विजय वाघ (नाटक- द सिक्रेट ऑफ लाईफ), रंगभूषा : प्रथम पारितोषिक अरविंद सुर्य (नाटक- अग्निमंथन), द्वितीय पारितोषिक सचिन थोरात (नाटक-ट्रान्स) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक राघवेंद्र कुलकर्णी (नाटक- असाही एक कलावंत) व उन्नती कांबळे (नाटक- बैदा), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे नेहा नाईक (नाटक- द सिक्रेट ऑफ लाईफ), किर्ती कदम (नाटक- रायगडाला जेव्हा जाग येते), शितल इनामदार (नाटक - बाई), देवीका भोसले (लगीन), अनुष्का पानसरे (नाटक- चक्रव्यूव्ह), अक्षय काळकुटे (नाटक- बैदा), अमोद देव (नाटक - सुखांशी भांडतो आम्ही), योगेश सातपुते (नाटक- गिहाण), सुनील शिंदे (नाटक- अमन), सुहास संत (तुफानाचे घर)
२० नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जुगलकिशोर ओझा, चंद्रकांत जाडकर आणि अनुया बाम यांनी काम पाहिले.