शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

तेल लावलेल्या पहिलवानाला हरविण्यासाठी बारामतीत लोकसभेचा आखाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 1:33 PM

नात्यांमध्ये दुरावा न आणता उमेदवार आयात करण्याची शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे....

- दुर्गेश मोरे

पुणे : कर्जतमधील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती, शिरुर, रायगड आणि सातारा लोकसभा मतदार संघांतून राष्ट्रवादीचाच उमेदवार लढणार असल्याचे घोषित केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्याने बारामतीच्या तेल लावलेल्या पहिलवानाला म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना चितपट करण्यासाठी अजित पवारांनी बारामती लोकसभेचा आखाडा निवडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. सद्यस्थितीमध्ये अजित पवार गटाकडे लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंविरोधात तसा तगडा उमेदवार नाही. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होत असली, तरी बारामती वगळता इतर ठिकाणी त्यांचा प्रभाव जाणवत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा न आणता उमेदवार आयात करण्याची शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे.

अजित पवार यांनी बारामती, शिरुर, रायगड आणि सातारा लोकसभा राष्ट्रवादीचाच उमेदवार लढणार असल्याचे घोषित केलेच, पण त्याचबरोबर कर्जतमधील सभेत आमदार रोहित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. त्यामुळे आता अजित पवार आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर दोन हात करण्याच्या तयारी दर्शविल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार द्यायचाच, असा आता कयास केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत: सिद्ध करायचे असेल, तर पुणे जिल्ह्यात दोन खासदार अजित पवार गटाचे असणे गरजेचे आहे.

सुनेत्रा पवारांचा पर्याय पण...

शिरुर लोकसभेमधून विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना अजित पवार गटाकडून प्रस्तावही गेल्याची चर्चा आहे. खासदार कोल्हे यांनी दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र दिले असून, सध्या ते शरद पवार गटाकडे आहे. मात्र, भविष्यात ते आपला निर्णयही बदलू शकतात. उरला प्रश्न बारामती लोकसभेचा. या मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्यासाठी अजित पवार यांच्याकडे एकही उमेदवार नाही, परंतु सध्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरविण्याची काही जणांची इच्छा आहे. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया व हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांचे यांचे सुरू असलेले काम, परंतु अजित पवार तसा धोका पत्करतील, असे नाही. कारण पुण्यात वर्चस्व ठेवायचे असेल, तर शिरुर आणि बारामती या दोन जागा जिंकाव्याच लागतील. दुसरीकडे लोकसभेसाठी बारामती विधानसभा निर्णायक ठरत असतो. जरी इथली ताकद सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे उभी केली, तरी इंदापूर, पुरंदर आणि भोरमधून त्यांना साथ मिळेलच, असे नाही, शिवाय सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांचा कितपत प्रभाव पडेल, याबाबतही साशंकता व्यक्त होत असल्याने सुनेत्रा पवारांच्या नावाला भाजप फारसे अनुकूल असेलच, असे नाही.

अजित पवार गटाची भिस्त कांचन कुलांवरच

२०१९ मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. त्यामुळे बारामती लोकसभेमध्ये भाजपला कमळ फुलवायचे आहे. त्यासाठी २०२०-२०२१ पासूनच भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीतील अजित पवार गट सत्तेमध्ये सहभागी झाल्याने भाजपची ताकद वाढली आहे. अजित पवारांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी तसा तगडा उमेदवार सध्या तरी दृष्टिक्षेपात नाही. त्यातच या मतदार संघावर भाजपचे विशेष लक्ष असल्याने अजित पवारांना कोणालाही उमेदवारी देण्यास शक्य होईल, असे नाही. सध्या उमेदवाराचा प्रश्न असला, तरी सध्याच्या परिस्थितीवरून उमेदवार आयातीचा मार्ग मोकळा आहे.

भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी गतवर्षी सुळेंना कमी वेळात चांगली टक्कर दिली आहे. कुल आणि पवार यांचे फारसे पटत नसले, तरी भीमा पाटस कारखाना सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कुल यांना मदत केली आहे, शिवाय फडणवीस-कुल यांच्यातील सख्य सर्वांनाच माहीत आहे. अजित गटाला उमदेवार मिळालाच नाही, तर फडणवीसांच्या मध्यस्थीने अजित पवार गटाकडून कांचन कुल यांना उमदेवारी मिळू शकते. तसे झाले, तर दौंड, इंदापूर, खडकवासलामध्ये भाजपची ताकद आहे, शिवाय अजित पवारांमुळे बारामती आणि इंदापूरच्या भरणे गटाची ताकद मिळेल. पुरंदरमधून काँग्रेस आमदार संजय जगताप हे शरद पवार गटाकडे राहिले, तरी भाजपने स्वत:ची या ठिकाणी ताकद उभी केली असून, अजित पवारांना मानणारा गटही आहे. तिकडे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे सुप्रिया सुळे यांच्याशी फारसे पटत नाही. त्यामुळे तेथूनही गोळाबेरीज होऊ शकते. त्याचबरोबर, बारामती इंदापूरवर धनगर समाजाचा प्रभाव असल्याने, भाजपने पक्षातील महत्त्वाच्या पदावर या समाजाला नेतृत्वाची संधी दिली आहे. त्यामुळे कुल यांना अनुकूल वातावरण सध्या तरी दिसत आहे.

संभ्रमावस्था आजही कायम

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आतापर्यंतच्या काळात अनेक मातब्बरांना धूळ चारली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीची बांधलेली मोट सहजासहजी सैल पडू देणार नाहीत. दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय एकत्रित आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर, बारामती, शिरुर, सातारा, रायगडवरमध्ये राष्ट्रवादीचाच उमदेवार लढणार असल्याचे सांगितले, पण याचा अर्थ, नक्की काय घ्यायचा, असा प्रश्न पडला आहे. रायगड वगळता तिन्ही ठिकाणी शरद पवार गटाचेच खासदार आहे. त्यामुळे असे वक्तव्य करून, अजित पवारांनी पुन्हा एकदा संभ्रमावस्था निर्माण केल्याचे राजकीय जाणकारांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती