पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघातील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांतील आणि मावळ लोकसभा मतदार संघातील मावळ तालुक्यांतील मोठ्या प्रमाणातील मतदार पुणे लोकसभा मतदार संघात राहतात. यामुळे चार ते पाच विधानसभा मतदार संघ मिळून सुमारे दोन ते अडीच लाख दुबार मतदार असून, हे मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले.केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकाच्या घोषणा केल्या असून, पहिल्यादाच एकाच जिल्ह्यात निवडणुकांचे दोन टप्पे केले आहेत. यामध्ये पुणे आणि बारामती मतदार संघात २३ एप्रिल रोजी आणि शिरुर आणि मावळ २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या दोन टप्प्यामध्ये देखील तब्बल सात दिवसांचे अंतर ठेवले आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये नोकरी, धंद्यासाठी पुणे शहरामध्ये मध्ये पुणे लोकसभा मतदार संघामध्ये राहतात. त्यामुळे यापैकी सुमारे दोन ते अडीच लाख नागरिकांचे आपल्या गावात आणि शहरामध्ये राहतात त्या मतदार संघात देखील मतदान असते.शिरुर तालुक्यातील एकट्या जुन्नर विधानसभा मतदार संघातील सुमारे ३० ते ४० हजार मतदारांचे पुणे शहर आणि जुन्नर तालुक्यातील आपल्या गावामध्ये देखील मतदान असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले. त्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघातील सुमारे दोन ते अडीच लाख मतदार हे दुबार असण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर याच दुबार मतदारांना शिरुर आणि मावळ लोकसभेसाठी मतदान करण्याचा वाव निवडणुक आयोगाने ठेवला आहे. यामुळे या दुबार मतदानाचा फायदा कुणाला होणार, कोणत्या उमेदवाराच्या पथ्थावर हे दुबार मतदान पडणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.जिल्हा निवडणुक प्रशासनाने लोकसभा निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी तयार करताना घरोघरी जाऊन दुबार मतदारांची तपासणी केली आहे. यापैकी काही दुबार मतदार यादीमधून वगळण्यात देखील आले आहेत. परंतु अद्यापही बहुतेक सर्व मतदार संघांमध्ये दुबार मतदार शिल्लक आहेत. त्यामुळे अशा दुबार मतदारांची स्वतंत्र यादी करुन संबंधित मतदान केंद्रांवर ही दुबार मतदार यादी देण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस व दुबार मतदान होणार नाही यासाठी प्रशासनाकडून पूर्णपणे खबरदारी घेण्यात येणार आहे.-मोनिंका सिंह, जिल्हा उपनिवडणूक निर्णय अधिकारीविधानसभा मतदार संघनिहाय मतदारशिरुर लोकसभा मतदार संघ :जुन्नर विधानसभा : २ लाख ९६ हजार ५०आंबेगाव विधानसभा : २ लाख ७६ हजार ८१४खेड-आळंदी विधानसभा : ३ लाख १६ हजार ४३६शिरुर विधानसभा : ३ लाख ५७ हजार २६३मावळ विधानसभा मतदार संघमावळ विधानसभा : ३ लाख ३२ हजार ११२
Lok Sabha Election 2019: दोन टप्प्यातल्या मतदानामुळे दुबार मतदानाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 3:06 AM