उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी इंदापूर येथील छोट्या सभेत निधीवाटपाबाबत एक वक्तव्य केलं होतं. यानंतर अजित पवार यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार होती. या प्रकरणी आता अजित पवार यांना आयोगाने दिलासा दिला आहे.
राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड; अधिकाऱ्यांची धावपळ, मतदार रांगेत ताटकळले
बारामती लोकसभा मतदारसंघातील रिटर्निंग ऑफिसर यांनी अजित पवार यांनी क्लीन चिट दिली. निवडणूक आयोगाने काल एक अहवाल पाठवला आहे. या अहवालात अजित पवार यांनी इंदापूर येथील सभेत केलेल्या वक्तव्यात आदर्श आचारसंहितेचा भंग नसल्याचे आहवालात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडीओ पाहिला . या व्हिडीओत आचार संहितेचे उल्लंघन झाल्याचं आढळून आलेले नाही, अशी माहिती निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. अजित पवार यांच्या सभेतील व्हिडीओत पवार यांनी कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराला मतं द्यायची या उल्लेख केलेला नाही. अजित पवार मतदारांना ईव्हीएमसाठी मतदान करण्यास सांगत असल्याचे ऐकले, उमेदवार किंवा पक्षाला मत द्या, असे ते म्हणालेले नाहीत यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही, असंही त्यांनी यात म्हटले आहे.
अजित पवार नेमकं काय बोलले होते?
इंदापूरात काही दिवसापूर्वी सभा होती. यावेळी अजित पवार म्हणाले होते की, काय लागेल तो निधी द्यायला सहकार्य करू, पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटण दाबा कचाकचा, म्हणजे मलाही बरे वाटेल. नाही तर माझा हात आखडता होईल, या वक्तव्यावरुन वाद सुरू झाला होता.