किरण शिंदे
बारामती लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरूल आहे. या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे . शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारण पूर्णतः बदलले. दोन्ही पक्षातील दिग्गज नेत्यांनी आपल्याच पक्षातील प्रमुखाविरोधात शड्डू ठोकले आहेत. हे नेते एकमेकांविरोधात गंभीर स्वरूपाची टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांना डिवचल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांचा फोटो त्यांनी आपल्या स्टेटसला ठेवला आणि कितीबी येऊ देत, आमचा बॉस एकटा पुरेसा असल्याचा त्यांनी म्हटलंय, यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून अयोध्या पौळ मैदानात?, सोशल मीडियावरुन दिली माहिती
खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर शरद पवारांचे दोन फोटो वापरलेत. एका फोटोत पवारांनी हात वर केलेला आहे तर दुसऱ्या फोटोत ते कॉलर उडवताना दिसताय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांना राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असे विचारले होते. त्यावेळी पवारांनी क्षणाचाही विचार न करता हात वर करत मी स्वतः असं सांगितलं होतं. तेव्हा हा फोटो प्रचंड गाजला होता. तर दुसरा फोटो आहे साताऱ्यातला. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांना उदयनराजे यांच्या विरोधात संभाव्य उमेदवार कोण असेल असे विचारले होते. त्यावेळी शरद पवारांनी कॉलर उडवत उत्तर दिले होते. या दोन्ही फोटोची तेव्हा खूप चर्चा झाली होती.
नेमके हेच फोटो सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्स अप स्टेटस वर ठेवले आणि कितीबी समोर येऊ देत त्यांना एकटा बास असं म्हणत विरोधकांना डिवचल आहे.
बारामतीत पवार विरुद्ध पवार
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. तर त्यांच्या विरोधात पवार कुटुंबातीलच सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत पाहायला मिळणार आहे. तर राज्यातील अनेक मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात थेट लढत होणार आहे. कधीकाळी एकमेकांचे मित्र असलेले या दोन्ही पक्षातील नेते आता आमने-सामने उभे ठाकले आहेत. हेच नेते एकमेकांवर टोकाची टीका करतानाही दिसत आहेत.
या लढतीत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उडी घेतली असून कितिबी समोर येऊ देत, त्यांना एकटा बास असं म्हणत विरोधकांना चिडवल आहे. आता यावर विरोधकांकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.