लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरूरचा गड अमोल कोल्हेंनी जिकला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:38 PM2019-05-23T22:38:57+5:302019-05-23T22:39:10+5:30

आतापर्यंत तीनदा विजय मिळवत हॅट्रिक साधलेल्या आढळरावांचा पराभव करत अमोल कोल्हे शिरूर मध्ये जायंट किलर ठरले आहे

Lok Sabha election results 2019: Amol kolhe winner in shirur...! | लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरूरचा गड अमोल कोल्हेंनी जिकला...!

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरूरचा गड अमोल कोल्हेंनी जिकला...!

googlenewsNext

शिरूरः शिवसेनेचे खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आतापर्यंत तीनदा विजय मिळवत शिरूरला हॅट्रिक साधली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसने काही करून हाशिरूर मतदारसंघ जिंकायचाच असा निर्धार करत कोल्हेंसाठी अपार मेहनत घेतली होती. या मेहनतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यापर्यंत अशा सगळ्यांच्या जोरदार तयारीवर विद्यमान खासदारशिवाजीराव आढळराव पाटील यांचा ५८,४८३ मतांनी पराभव करत शिरूरचा गड जिंकला.. 
शिवाजीराव हे  कोल्हे यांना पराभूत करून ते विजयाचा चौकार मारणार का याबाबतच सगळीकडे उत्सुकता आहे. आढळराव पाटील यांनी सलग 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा जोर लावला आहे. स्थानिक उमेदवारांना संधी देऊनही यश न मिळाल्याने राष्ट्रवादीने यंदा शिवसेनेतून आयात केलेले अभिनेते अमोल कोल्हे यांना संधी दिली आहे. कोल्हे यांनाही तरुण आणि महिला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, इथे अटीतटीची लढत बघायला मिळाली होती. 
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तसेच सर्वच फेऱ्यांमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली..त्यांना या निवडणुकीत शिरूरमध्ये  ६,३५,८३० मतं मिळाली असून शिवाजीराव आढळराव यांच्या पारड्यात ५, ७७, ३४७ मतं पडली आहेत. 
2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची लढत करून एकत्रित ताकद लावूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी सलग विजय मिळवित हॅटट्रिक साधली होती.  आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम यांच्यावर तब्बल ३ लाख 1 हजार 453 मतांनी विजय मिळविला होता. आढळराव यांना 6, 42, 828 तर देवदत्त निकम यांना 3, 41, 375 मते मिळाली होती. शिवसेनेतून ऐन वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाऊन लढणारे अशोक खांडेभराड यांना केवळ 36, 431 मते तर आम आदमी पक्षाचे सोपानराव निकम यांना 16, 653 मते मिळाली होती.  11 हजार 971 मतदारांनी नकाराधिकार (नोटा) वापरला होता.

Web Title: Lok Sabha election results 2019: Amol kolhe winner in shirur...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.