पुणे : रातरागिणी उपक्रमात सहभागी महिलांना नाइट वॉक संपल्यावर घरी जाण्यासाठी पीएमपीने विशेष बसची सुविधा केली आहे. अलका चौक ते शनिवार वाड्यापर्यंतचा रातरागिणी नाइट वॉक पूर्ण केल्यानंतर महिलांना घरी सुखरूप पाेहाेचता यावे यासाठी पीएमपीने खालील मार्गावर रात्री १२ ते १ पर्यंत या विशेष बस सुरू राहणार आहेत.
या मार्गावर असणार सेवा
शनिवारवाडा ते
कोथरूड - बस मार्ग क्र. ९४
कात्रज - बस मार्ग क्र. २ अ
धनकवडी - बस मार्ग क्र. ३८
स्वारगेट - बस मार्ग क्र. २
हडपसर - बस मार्ग क्र. १८०
एनडीए गेट - बस मार्ग क्र. ७
संगमवाडी - बस मार्ग क्र. २०
वाघोली - बस क्र. ९८
‘लोकमत’ने महिलांसाठी आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाचा संपूर्ण पाठिंबा आहे. ‘रातरागिणी’ उपक्रमात सहभागी महिलांना नाइट वॉक पूर्ण केल्यावर घरी सुखरूप पोहोचता यावे यासाठी ‘रातराणी’ ही विशेष सुविधा महामंडळाने देण्याचा निर्णय केला आहे.
- डॉ. संजय कोलते, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
महिलांच्या सन्मानासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी ‘लोकमत’तर्फे आयोजित हा उपक्रम समाजाला विचार करायला भाग पाडणारा आहे. शासकीय महिलांना येण्या-जाण्यासाठी विशेष गाडी असते. सोबत रक्षक असतो; मात्र, सर्वसाधारण महिला ही स्वतःची रक्षक असते. त्यामुळे ‘रातरागिणी’ या कार्यक्रमामुळे महिलांचे मनोबल नक्कीच वाढणार आहे.
- प्रज्ञा पवार-पोतदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएमएल