मर्यादित कालावधीसाठी म्हणजेच २७ महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या या योजनेत ग्राहक, सभासद व गुंतवणूकदारांना किमान १० हजार रूपये व त्यापेक्षा अधिकची रक्कम गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ०.५ टक्के अधिकचे व्याज आहे. विशेष म्हणजे या योजनेत त्रैमासिक व्याजाचा परतावा घेण्याची सोय असून आजच्या आर्थिक परिस्थितीत तो आकर्षक असा आहे.
संस्थेच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधून ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल तसेच घरबसल्या 'ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉम'च्या माध्यमातून (www.lokmanyaonline.com/deposit) देखील या योजनेमध्ये पैसे गुंतविता येणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गरजेनुरूप कमी-अधिक कालावधीचे विविध गुंतवणूक पर्याय देखील संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संस्थेच्या विविध सेवा सुविधांच्या माहितीसाठी ग्राहक, सभासद, गुंतवणूकदार 18002124050 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घावी आणि नेहमी मास्क लावावे, नियमित अंतराने हात स्वच्छ करावेत, सामाजिक अंतर राखावे तसेच शासनाने लागू केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन 'लोकमान्य सोसायटी'तर्फे करण्यात आले आहे. (वा.प्र.)