आज पुण्यनगरीत गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा होत आहे; मात्र त्यामध्ये ‘ती’ला विशेष स्थान दिले जात नाही. पण, लोकमतने जी ‘ती’चा गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे; त्यामुळे महिलांना खरेच समाजात एक वेगळे स्थान मिळाले आहे. ‘ती’ आणि ‘स्त्री’ला लोकमतने उत्सवात खऱ्या अर्थाने मान मिळवून दिला. समाजाची एकंदर परिस्थिती पाहिली, तर महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे. ‘शिक्षणाचा अभाव’ हेच याचे कारण आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर लगेच ‘ती’चे लग्न लावून दिले जात असल्यामुळे स्वत:च्या पायावर महिला उभ्या राहू शकत नाहीत. यासाठी पालकांची मानसिकता बदलायला हवी, असे मत भोसरीच्या राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेजच्या संचालिका कोमल साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.सध्या महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. विविध क्षेत्रांत त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. कौटुंबिक जबाबदारीबरोबरच ‘ती’ या जबाबदाºयाही सक्षमपणे पेलत आहे. पण तरीही नैसर्गिकपणे तिच्यावर आलेल्या काही जबाबदाºयांना अनेक मर्यादा येतात. त्याचा परिणाम तिच्या सार्वजनिक जीवनातील प्रगतीवर होत असतो. पण, अनेक महिला त्यावरही मात करून पुढे जात आहेत. काही महिलांनी केवळ कौटुंबिक जबाबदारीच स्वीकारली आहे. महिलांचा ओढाही कुटुंबाकडे अधिक असतो. समाज सुदृढ होण्यासाठी हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे घरामध्येही महिलांना मानसन्मान मिळायला हवा. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, कुठे तरी हे भान आपण विसरत चाललो आहोत.पुणे हे विद्येचे माहेरघर असतानाही अवघ्या पुण्यात शाहू शिक्षण संस्थेचेच एकमेव महिलांचे विधी महाविद्यालय आहे. पुण्यासारख्या शैक्षणिक नगरीमध्ये अशी चार ते पाच तरी महाविद्यालये असायला पाहिजे होती. महिलांचे पुरुषांच्या तुलनेत शिक्षणाचे प्रमाण पाहिले, तर ते नगण्य असेच आहे. आजच्या काळातही घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागलेल्या अनेक महिला आहेत. आमच्या विधी महाविद्यालयात ज्या काही मुली येतात, त्या या हिंसाचाराला बळी पडलेल्याच आहेत. अशा महिलांचे प्रमाण हे जवळपास ४० टक्के आहे. कौटुंबिक हिंसाचारामध्ये अत्याचार सहन करताना त्यांनी अनेकांकडे अगदी स्वत:च्या कुटुंबाकडेदेखील दाद मागितली; मात्र त्यांना विशेष पाठिंबा मिळाला नाही. त्यांच्यावर अत्याचार झाल्यामुळेच त्यांना विधीचे शिक्षण घ्यायची इच्छा आहे. स्वत:चे रक्षण करण्याबरोबरच इतर महिलांनाही त्यांना प्रेरित करण्याची इच्छा आहे. पदवीधर महिलांना या महाविद्यालयात विधीचे शिक्षण दिले जाते.आज पुण्यनगरीत गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा होतो आहे. मात्र, त्याकडे केवळ उत्सव म्हणून पाहिले जाते. यामध्ये ‘ती’ला विशेष स्थान दिले जात नाही. मात्र, लोकमतने जी ‘ती’चा गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे; त्यामुळे महिलांना खरेच समाजात एक वेगळे स्थान मिळाले आहे. ‘ती’ आणि ‘स्त्री’ला लोकमतने उत्सवात खºया अर्थाने मान मिळवून दिला. आजपर्यंत हा उत्सव पुरुषांचा होता, स्त्रीला दुय्यम स्थान होते. हे खरेच आहे, की केवळ पूजेची आणि नैवेद्याची थाळी सजवणे एवढेच तिच्या कामाचे स्वरूप मर्यादित होते. कुठे तरी ‘ती’ची कुचंबणा होत होती. ‘ती’ला तिच्या हक्कांची जाणीव होत होती; पण बोलण्याचे धाडस होत नव्हते. परंतु, लोकमतने ‘ती’चा गणपती ही अभिनव चळवळ उभी केली आणि जनमानसाला ‘ती’चे महत्त्व पटवून दिले. महिलांना वेगळे काही तरी करून दाखविण्याची चांगली संधी आहे, घरेलु अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना समाजात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करून ‘विघ्नहर्त्या’समोर अशा माध्यमातून येण्याकरिता एका अर्थाने व्यासपीठच मिळाले आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळालेले असतानाही त्यांच्यावर अत्याचार होतच आहेत. केवळ घरकाम करणाºया महिलांमध्येच हे प्रमाण आहे असे नाही, तिथेच दारू वगैरेसारखी व्यसने पाहायला मिळतात असेही नाही; तर उच्चभ्रू, सुशिक्षित समाजामध्येही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. एक आढावा घेतला तरी प्रत्येक दुसºया घरात कौटुंबिक हिंसाचार पाहायला मिळतो. शिक्षणाचा अभाव हेच याचे प्रमुख कारण आहे. पदवी घेतल्यानंतर लगेच ‘लग्न कर’ असा दबाव पालकांकडून टाकला जातो. मुलींनी आधी स्वत:च्या पायावर उभे राहायला हवे. मुलींना शिकायचे आहे; पण पालकांची मानसिकता बदलायला हवी.
लोकमतने दिला ‘ती’ला खरा सन्मान- कोमल साळुंखे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 1:55 AM