पुणे : भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर जगातील सर्व देशांतील धुरिणांनी एकत्र येऊन अर्थव्यवस्थेला निश्चित दिशा देण्यासंदर्भात सर्वंकष चर्चा करावी आणि योग्य धोरण ठरवावे या हेतूने जागतिक पातळीवरील क्रमांक एकचे मराठी वृत्तपत्र ही चर्चा घडवून आणत आहे. सिंगापूरमधील पंचतारांकित विश्वविख्यात हॉटेल शांग्रिलामध्ये ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’चे आयोजन करण्यात आले आहे. हे कन्व्हेन्शन सिंगापूरमध्ये २८ मार्च रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणार आहे.
या कॉनक्लेव्हमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तव्यवस्था, बँकिंग, पायाभूत सुविधा, पर्यटन इ. विषयांवर सखोल चर्चा व विचारमंथन होणार आहे. फक्त अर्थव्यवस्था हा विषय न घेता स्टेम सेल्स, टेक्सटाईल, फार्मास्युटिकल्स, हॉस्पिटॅलिटी अशा विषयांचाही या कन्व्हेन्शनमध्ये समावेश असल्याने हे कन्व्हेन्शन वैविध्यपूर्ण ठरणार आहे. जैन आध्यात्मिक गुरू लोकेश मुनीजी, ज्येष्ठ माध्यमकर्मी पद्मभूषण रजत शर्मा, राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, रेमंड उद्योग समुहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया, बँकर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आघाडीवर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, वेलस्पन ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली गोयंका, सेलो वर्ल्डचे चेअरमन व न्यू एज बिलियनर प्रदीप राठोड, प्रवीण मसालेवालेचे संचालक विशाल चोरडिया, सुप्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा, इन्स्पिरा एन्टरप्राइजचे संस्थापक प्रकाश जैन, भारताचे गोल्डम’न व रिद्धी सिद्धी बुलियन्सचे संस्थापक पृथ्वीराज कोठारी, मोहन मुथा ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष सुरेश मुथा, पोकर्ण ग्रुपचे अध्यक्ष गौतमचंद जैन, अजंता फार्माचे उपाध्यक्ष मधुसूदन अगरवाल, पगारिया ग्रुपचे संस्थापक उज्ज्वलकुमार पगारिया, बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल मेडिसीन स्पेशालिस्ट डॉ. गौतम भन्साली, संस्थापक - नवमी हॉटेल्सचे सूर्या व रितु झुनझुनवाला, ऑप्टिमम सोल्यूशन्सचे संस्थापक बलवंत जैन, संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनला संबोधित करणार आहेत. या कॉनक्लेव्हचे अध्यक्षपद लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा हे भूषविणार आहेत. विविध विषयांना वाहिलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची अशाप्रकारची शिखर परिषद पहिल्यांदाच होत आहे.
मरूधरांच्या कुटुंबांचा जागतिक पटलावर होणार सन्मान -या कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. विजय दर्डा हे असणार आहेत. राजस्थान या मरुभूमीतून गरुडझेप घेत राज्याबाहेर आणि देशाबाहेर म्हणजेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी लोकमत मरूधर सन्मानाचे प्रयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, या सोहळ्यात व्यक्तीसोबत त्यांच्या कुटुंबाचा सन्मान होणार आहे. या सन्मानासाठी लोकांचा भिन्न क्षेत्रांमधून उदंड प्रतिसाद मिळाला. या पुरस्कारासाठी लोकांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्या शेकडो प्रवेशिकांमधून मोजक्या प्रवेशिकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या पुरस्काराचा लोकमत मरूधर सन्मानाचा दिमाखदार समारंभही या कन्व्हेन्शनच्या दरम्यान सकाळच्या सत्रात रंगणार आहे. मरूधर सन्मानाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित व्यक्तींच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या समितीद्वारे या पुरस्कारासाठी अंतिम नावांची निवड करण्यात आली आहे.
लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवॉर्डने होणार गाैरवदेशाच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या विकासात महिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. या नारीशक्तीचा जागतिक स्तरावर सन्मान व्हावा, यासाठी लोकमतने विविध उपक्रम राबवून नेहमीच पुढाकार घेतला आहे. विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कार्य करून संपूर्ण जगात नाव कमावलेल्या महिलांना लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवॉर्डने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळाही या कन्व्हेन्शनच्या दरम्यानच संध्याकाळच्या सत्रात होणार आहे.
विविध ब्रँड्स व व्यक्तींना या कॉनक्लेव्हमध्ये सहभागाची संधी आहे. सहभागासाठी संपर्क : सागनिक - ९२०९६१५५०४