सिंगापूर : सर्वच क्षेत्रातील आश्वासक वाटचालीमुळे आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू पाहत आहे. आतापर्यंतच्या वाटचालीचा सकारात्मक आढावा घेऊन येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेला योग्य दिशा देण्यासंदर्भात सर्वंकष चर्चा व्हावी, या हेतूने 'लोकमत'ने आयोजित केलेल्या 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'ला दिमाखात सुरुवात झाली. सिंगापूरमधील पंचतारांकित विश्वविख्यात हॉटेल शांग्रिलामध्ये गुरुवारी सकाळी कन्व्हेन्शन'ला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.
यावेळी जैन आध्यात्मिक गुरु लोकेश मुनीजी, राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, रेमण्ड उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया, बैंकर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आघाडीवर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, वेलस्पन ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली गोयंका, सेलो वर्ल्डचे चेअरमन व न्यू एज बिलियनर प्रदीप राठोड, प्रवीण मसालेवालेचे संचालक विशाल चोरडिया, सॉलिटेयर ग्रुपचे संचालक प्रमोद रांका, सुप्रसिद्ध अभिनेते व कवी शैलेश लोढा, ख्यातनाम लेखिका आणि एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका स्वाती लोढा, नोबेल कास्ट कॉम प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन नितीन भागवत, इन्स्पिरा एन्टरप्राइजचे संस्थापक प्रकाश जैन, मोहन मुथा ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष सुरेश मुथा, पोकर्ण ग्रुपचे अध्यक्ष गौतमचंद जैन, अजंता फार्माचे उपाध्यक्ष मधुसूदन अगरवाल, पगारिया ग्रुपचे संस्थापक उज्ज्वलकुमार पगारिया, बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल मेडिसीन स्पेशालिस्ट डॉ. गौतम भन्साली, भारताचे गोल्डमॅन व रिद्धीसिद्धी बुलियन्सचे संस्थापक पृथ्वीराज कोठारी, संस्थापक नवमी हॉटेल्सचे सूर्या व रितू झुंझुनूवाला, एआय तंत्रज्ञानातील अग्रणी कृष्णन भास्करन, पगारिया ग्रुपचे संचालक उज्ज्वल पगारिया, ऑप्टिमम सोल्युशन्सचे संस्थापक बलवंत जैन, तिरुपती बालाजी देवस्थान बोर्डच्या विश्वस्त सपना सुधीर मुनगंटीवार, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू मंगल प्रभात लोढ़ा, संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष घोडावत आदींसह लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा उपस्थित होते.