शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

Lokmat Impact: पुणे महापालिकेच्या दारात रात्रीतुन उभारण्यात आलेल्या हाेर्डिंगवर कारवाई

By राजू हिंगे | Published: May 17, 2024 2:35 PM

नियमात नसतानाही होर्डिंग उभारण्यास महापालिका अधिकारी परवानगी देत असल्याने होर्डिंगच्या परवानगी प्रक्रियेवरच उभे राहिले प्रश्नचिन्ह

पुणे :  पुणे महापालिकेच्या दारातच भर रस्त्यावर सर्व नियम धाब्यावर बसवुन माेठे हाेर्डिंग उभारण्यात आले. एका रात्रीतुन हे हाेर्डिंग उभारण्याची कारनामा करण्यात आला. या बाबतचे वृत दैनिक लोकमतने दिल्यानंतर पालिका प्रशासनाला अखेर जाग आली आहे. त्यानंतर या हाेर्डिंगवर पालिकेने कारवाई करून ते काढुन टाकण्याचे काम सुरू केले आहे. 

मुंबईतील घाटकाेपरची घटना ताजी असतानाही ऐन वर्दळीच्या ठिकाणी ‘पीएमपी’कडून हाेर्डिंग उभारले जात आहे. पुणे महापालिकेच्या  आकाश चिन्ह व परवाना विभागाने या हाेर्डिंगला आणि झाडाच्या फांद्या कापण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, झाडाच्या फांद्या तोडून होर्डिंगची उभारणी करू नये, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले हाेते. त्यानंतरही चक्क महापालिकेच्याच दारात आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करून हाेर्डिंग उभारले  गेले. अनधिकृत, धोकादायक होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर असताना पालिका मुख्य इमारतीसमोरच होर्डिंग उभारण्यासाठी परवानगी देत आहे. अगोदरच पीएमपीच्या बसमुळे कायम महापालिकेच्या नवीन इमारतीसमोर वाहनांची गर्दी असते. अशात भर रस्त्यावर पीएमपीला होर्डिंग उभारण्याची परवानगी दिली आहे. नियमात नसतानाही अशा प्रकारे होर्डिंग उभारण्यास महापालिका अधिकारी परवानगी देत असल्याने होर्डिंगच्या परवानगी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रस्त्यावर उभारण्यात येणारे होर्डिंग महापालिका काढणार का? असा  सवाल उपस्थित केला होता. या बाबत लोकमतने वृत दिले होते. त्यानंतर पालिकेच्या प्रशासकीय वतुळात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर पालिका प्रशासनाने या होर्डिंगवर कारवाई केली.   महापालिका पीएमपी बसथांब्यावर दररोज हजारो प्रवासी येतात. ज्या ठिकाणी होर्डिंग उभे केले जात आहे तेथेच रांगेत अनेक जण बसची वाट पाहत उभे असतात. तरीही नागरिकांच्या सुरक्षेचा विचार न करता महापालिकेने थेट परवानगी दिली आहे. त्यामुळे या होर्डिंगला परवानगी देणा०या अधिका०यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिकcommissionerआयुक्त