राजानंद मोरे- पुणे : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे (आयसीएमआर)च्या डिस्चार्ज प्रोटोकॉलनुसार लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना किमान दहा दिवस रुग्णालयात ठेवणे आवश्यक आहे. पण ससून रुग्णालयाकडून काही दिवसांपासून घरी लक्षणे सुरू झाल्यापासूनचे पुढील दहा दिवस ग्राह्य धरत चार-पाच दिवसानंतर रुग्णांना घरी सोडले जात असल्याचे समोर आले होते. याबाबत 'लोकमत'मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तानंतर रुग्णालयाकडून पुन्हा दहा दिवसांचा प्रोटोकॉल करण्यात आला आहे.ससूनच्या या डिस्चार्ज प्रोटोकॉलबाबत 'लोकमत'मध्ये दि. १ जून रोजी वृत्त प्रसिध्द झाले. या प्रोटोकॉलवर महापालिका आरोग्य विभागासह काही खासगी रुग्णालयांकडूनही टीकेचा सुर उमटला. त्यानंतर दोन दिवसातच रुग्णालयाकडून हे धोरण बदलण्यात आले. रुग्णालयाने प्रसिध्दीस दिलेल्या अहवालानंतर दि. २५ मे ते १ जून या कालावधीत २० हून अधिक रुग्णांना दहा दिवसांच्या आत घरी सोडले होते. एक रुग्ण तर केवळ चार दिवस रुग्णालयात होता. तीन प्रसुती झालेल्या महिलांनाही सहा दिवसांत घरी सोडण्यात आले. ह्यलोकमतह्णच्या वृत्तानंतर दि. ३ ते ६ जून या कालावधीत एकुण ३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. पण त्यातील एकाही रुग्णाला दहा दिवसांच्या आत डिस्चार्ज दिलेला नाही, असे रुग्णालयाच्या अहवालावरूनच स्पष्टपणे दिसते.सुधारित प्रोटोकॉलनुसार, लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना सलग तीन दिवस ताप नसल्यास दहा दिवसांनी चाचणी न करता घरी सोडण्यात येते. बहुतेक रुग्णालयांमध्ये दहा दिवस या रुग्णांवर उपचार केले जातात. पण ससून रुग्णालयाने मे महिन्याच्या अखेरीस दहा दिवसांचा कालावधी पुर्ण न होऊ देताच ४-५ दिवसांतच रुग्णांना घरी सोडण्यास सुरूवात केली होती. रुग्णालयाकडून घरी लक्षणे असले दिवस आणि रुग्णालयातील दिवस एकत्रित करून १० दिवसांचा कालावधी निश्चित केला करण्यात आल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला होता. या रुग्णांची चाचणीही घेतली जात नव्हती.------------------------दि. २५ ते २ जूनपर्यंत १० दिवसांच्या आत घरी पाठविलेले रुग्ण दिवस दहा दिवसांच्या आतील रुग्ण एकुण रुग्ण२५ मे ३ ७२६ मे १ ४२७ मे २ १०२८ मे २ ११२९ मे ३ ६३० मे ७ ११३१ मे ५ १०१ जून १ ३२ जून १ २----------------------दि. ३ ते ६ जूनदरम्यान घरी सोडलेले एकुण रुग्ण (दहा किंवा त्याहून अधिक दिवस)दिवस रुग्ण३ जून ७४ जून ११५ जून ६६ जून १४--------------------------
Lokmat impact : ससूनचा 'डिस्चार्ज प्रोटोकॉल'पुन्हा बदलला; आता दहा दिवसांनीच सोडतायेत घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 1:21 PM