राजानंद मोरेपुणे : रेल्वेच्या पार्सल विभागात नागरिकांची होणारी लुट तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी '' लोकमत '' ने उजेडात आणल्यानंतर मध्य रेल्वेच्यापुणे विभागाने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना पार्सल बाबत सर्व प्रकारची माहिती या हेल्पलाईनवर मिळणार आहे. नागरिकांना पार्सल बुक करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक जण एजंटांकडून पार्सल बुक करतात. तिथे पार्सल पॅकिंग व इतर कारणांसाठी अधिक रक्कम घेऊन त्यांची लुट केली जाते. तसेच पार्सल बुक केल्यानंतर ते नेमके कधी पोहचणार, याची शाश्वती नसते. नागरिकांना याची योग्यप्रमारे माहितीही मिळत नाही. याबाबत '' लोकमत '' ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वेने नागरिकांच्या मदतीसाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. रेल्वे प्रवास करताना सामानाचे बुकिंग करणाऱ्या प्रवाशांसाठीही ही हेल्पलाईन उपलब्ध असेल. पार्सल शी संबंधित सर्व प्रकारच्या अडचणी व तक्रारीच्या पार्श्वभुमीवर ही हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.पार्सल विभागाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती या हेल्पलाईनवर उपलब्ध होईल. बुक केलेल्या पार्सल किंवा सामानाची स्थिती म्हणजे सध्या हे पार्स कुठे आहे, कुठे उतरविण्यात आले आहे, गाडीमध्ये कधी ठेवण्यात आले, कधी पोहचणार अशी सर्वप्रकारची माहिती नागरिकांना हेल्पलाईनवर मिळू शकणार आहे. या क्रमांक २४ तास उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना पार्सल किंवा सामान बुकिंगबाबत माहिती हवी असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. ---------पार्सल विभागाची हेल्पलाईन - ८९५६९४३५६५----------एजंटांवर लक्षपार्सल विभागाच्या आवारात अनधिकृतपणे वावरणाऱ्या एंजटांना हटविण्यास रेल्वेच्या सुरक्षा विभागाने सुरूवात केली आहे. या परिसरात कोणत्याही एजंटला थांबण्यास मज्जाव करण्याच्या सुचना विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनीही पार्सल बुकिंगसाठी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडे जाण्याऐवजी रेल्वे कर्मचाºयांकडेच जावे. पार्सल विभागातील कर्मचाऱ्यांनाही याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच पार्सल पॅकिंगचे काम खासगी एजन्सीकडून निश्चित दरामध्ये लवकरच सुरू केले जाणार आहे. ----------------पार्सल विभागाशी संबंधित अडचणींबाबत स्वतंत्र हेल्पलाईन २४ तास सुरू करण्यात आली आहे. यापुवीर्ही कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना पार्सलबाबत सुचना दिल्या जात होत्या. पण आता स्वतंत्र हेल्पलाईन म्हणून नागरिकांना उपलब्ध असेल. याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा एजन्सीलाही अनधिकृत व्यक्तींबाबत सुचित करण्यात आले आहे. - संजय सिंग, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, पुणे विभाग, मध्य रेल्वे----------
लोकमत इम्पॅक्ट : रेल्वे " पार्सल " साठी रेल्वेची स्वतंत्र हेल्पलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 7:00 AM
रेल्वेच्या पार्सल विभागात नागरिकांची होणारी लुट तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी '' लोकमत '' ने उजेडात आणली होती..
ठळक मुद्देपुणे विभागाचा निर्णय : लोकमतने उजेडात आणला होता भोंगळ कारभारपार्सल शी संबंधित सर्व प्रकारच्या अडचणी व तक्रारीच्या पार्श्वभुमीवर ही हेल्पलाईन सुरू