पुणे : लोकमत आयोजित हिरो ड्युएट प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय खत्री बंधू पॉट आईस्क्रिम व मस्तानी धमाल गल्लीमध्ये तरुणींच्या उत्साहाला चार चाँद लावण्याकरिता सध्या गाजत असलेल्या ‘बबन’ चित्रपटातील भाऊसाहेब शिंदे व गायत्री जाधव यांनी उपस्थिती लावली. ग्रामीण बोलीतील संवाद उपस्थितांसमोर सादर करत सर्वांची मने जिंकली. भाऊसाहेब शिंदे यांनी एका गीतावर मनमुराद डान्स करून कल्लाच केला.‘लोकमत’च्या धमाल गल्लीमध्ये रस्त्यावर उतरून एकदम बिनधास्तपणे स्ट्रीट डान्स केला जातो, तर स्टेजवर ट्रेनर झुंबा अन् बॉलिवूड डान्सच्या स्टेप्सदेखील शिकवितात. परदेशामध्ये ही संकल्पना प्रसिद्ध असून, आता ‘लोकमत’नेदेखील पुढाकार घेऊन तरुणांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनाच रस्त्यावर उतरविले होते. यंदाच्या धमाल गल्लीत ‘बबन’ या चित्रपटाच्या टीमने तरुणांसोबत ठुमके लावले व भरपूर धमाल मस्ती केली. सकाळी ७ ते ९.३०दरम्यान झालेली ही धमाल लक्षणीय ठरली.रविवारची सकाळ डीपी रोड येथील महेश महाविद्यालय येथे झालेल्या ‘लोकमत’च्या धमाल गल्लीच्या उपक्रमाने बालचमूंसाठी संस्मरणीय ठरली. या उपक्रमाला पालकांसह लहान मुलांनी प्रचंड गर्दीसह हजेरी लावली. त्यांनी यात विविध खेळांच्या मौजमस्तीची अनोखी पर्वणी अनुभवली. डीपी रोडवर रंगलेल्या धमाल गल्लीत स्केटिंग, फ्लॅश मॉब, रस्सीखेच, आर्ट, क्रॉफ्ट, बॉलिवूड डान्स, क्रिकेट, फेस पेंटिंग, फोटो बूथ इन्स्टंट टॅटू, जेंबे, बँड परफॉर्मन्स, पुणेरी पगडी या कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला. तर लहान मुलांसाठी अँग्री बडर््स, स्नेक्स अँड लॅडर, किड्स कॉर्नर, फेस पेंटिंग असे अनेक प्रकारचे खेळ ठेवण्यात आले. डीजेचा ठेका... जल्लोष आणि नृत्य अशी धमाल मुलांनी या धमाल गल्लीत केली.सहभागी झालेले लहान-थोर बक्षिसांचे मानकरी ठरले. हिरो ड्युएटची टेस्ट ड्राइव्ह घेतलेल्या गणेश मालवडकर, प्रकाश काळे, शीतल महाशब्दे, सोनाली खुपेरकर, रूपेश बिचुकंडे या भाग्यवान विजेत्यांना कलाकारांच्या हस्ते चांदीचे नाणे देण्यात आले.खत्री बंधू पुणेकरांच्या पसंतीचे नं. १ मस्तानी व आइस्क्रिम यांच्याकडून उपस्थित २५ भाग्यवान विजेत्यांना आकर्षक कूल-कूल कुपन्स देण्यात आले. जिओच्या फोनच्या सेल्फी सेल्फीवॉलसोबत फोटो काढून बालचमूंनी आनंद घेतला. या कार्यक्रमात किड्स एज्युकेशन पार्टनर पोदार जम्बो किड्स मयूर कॉलनी होते.‘लोकमत बालविकास मंच’ या कार्यक्रमाचे फोरम पार्टनर होते. या कार्यक्रमासाठी पुणे महापालिका, पुणे पोलीस व पुणे वाहतूक पोलीस यांचे सहकार्य लाभले. मुलांचे आई-वडीलही यात सहभागी झाले. नकळत लहानपणीच्या दिवसांची सैर यानिमित्ताने झाल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. यानिमित्ताने विविध स्पर्धा आयोजिण्यात आल्या होत्या. यात मुलांसोबत ज्येष्ठांनीही धमाल केली. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.रसिकांच्या प्रेमामुळेच ‘बबन’ चित्रपटाने २० कोटींचा टप्पा पार केला आहे. चाहत्यांचा पाठिंबा यापुढील करिअरसाठी महत्त्वाचा ठरेल. ‘लोकमत धमाल गल्ली’ हा अभिनव उपक्रम आहे आणि तो कायमस्वरूपी राबविला पाहिजे.- भाऊसाहेब शिंदे
‘लोकमत’चा उपक्रम : सिनेकलाकारांसोबत मुलांनी केली धमाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 3:39 AM