पुणे : दररोज २३ लाखांपेक्षा जास्त पुणेकर त्यांच्या आवडीचा 'पुण्याचा 'लोकमत' वाचतात. या २३ लाखांमध्ये सर्व वयोगटांतील वाचकांचा समावेश आहे हे विशेष. शाळेत जाणाऱ्या परीपासून ते आजीची भूमिका पार पाडणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ महिलेपर्यंत 'लोकमत' हाच जगाची माहिती देणारा अत्यंत आवडीचा मार्ग आहे. 'हंसा' या संख्याशास्त्रीय अभ्यासात्मक अहवालासाठी प्रसिद्ध असणाऱ्या संस्थेने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून 'लोकमत' लाच पुणेकरांचा कौल असल्याचे शास्त्रशुद्ध शिक्कामोर्तब झाले आहे.
पुण्यातील सर्व स्तरांतील वाचकांबरोबर, कुटुंबांतील सर्व सदस्यांबरोबर थेट संपर्क साधून संस्थेच्या संख्याशास्त्रनिपुण कर्मचाऱ्यांनी हे सर्वेक्षण केले. मिळालेल्या माहितीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण केले. त्यातून 'लोकमत'च नेहमीप्रमाणे 'पुण्याचे क्रमांक १ चे दैनिक' असल्याच्या सत्याला आकडेवारीचे अधिष्ठान मिळाले.
पुरुष, महिला, त्यामध्ये विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, तसेच गृहिणी, कष्टकरी वर्ग अशा सर्व स्तरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. यापूर्वी २०१९ मध्ये 'इंडियन रीडरशिप सर्व्हे'च्या आकडेवारीनुसार 'लोकमत' हे देशातील पहिल्या क्रमांकाचे मराठी वृत्तपत्र आहे.
पुणेरी दैनिक-
सातत्याने वेगळे प्रयोग अन् सकारात्मक पत्रकारिता करत पुणेकर वाचकांचा विश्वास 'लोकमत'ने मिळवला आहे. पुणेकरांच्या मनातील कौल कायमच 'लोकमत'ला मिळत राहिला आहे. सदाशिव पेठ, कसबा पेठेतील वाचकांपासून ते पिंपरी-चिंचवड, उपनगरातील वाचकांची पसंती नेहमीच 'लोकमत' असल्याचे वेळोवेळी झालेल्या सर्व्हेवरून सिद्ध झाले आहे.
असे आहेत 'हंसा'चे निष्कर्ष-
'लोकमत'च्या एकूण वाचकसंख्येपैकी ४१ टक्के वाचक 'लोकमत' शिवाय दुसरे कोणतेही वर्तमानपत्र पसंत करत नाहीत. 'लोकमत' बंद करून अन्य वर्तमानपत्र सुरु करणाऱ्या वाचकांचे प्रमाण नगण्य आहे. अन्य स्पर्धक वर्तमानपत्रांच्या तुलनेत 'लोकमत'च्या वाचकांचा 'लोकमत'वर जास्त विश्वास आहे. इतर स्पर्धकांशी तुलना करता 'लोकमत'चा मजकूर प्रभावी असल्याचे वाचक सांगतात.
सर्व्हे हायलाईट्स-
- स्पर्धक वृत्तपत्रापेक्षा 'लोकमत'च्या वाचकसंख्येत गेल्या वर्षभरात झपाट्याने वाढ झाली आहे.
- पुणे, पिंपरी-चिंचवड भागातील सर्वात प्रभावी दैनिक लोकमत असल्याचे सर्व्हेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
- पुणे, पिंपरी-चिंचवड भागातील सर्वात जास्त वेळ वाचले जाणारे मराठी दैनिक लोकमत आहे.
२३ लाख वाचक-
'लोकमत' प्रतिस्पर्ध्यापेक्षा पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये २१% जास्त वाचकांशी जोडले गेले आहे. ५६% वाचक म्हणतात, दैनिक लोकमत म्हणजे विविध समूह घटकांशी जोडले गेलेले पुण्यातील एकमेव मराठी वृत्तपत्र.
१२ लाख हक्काचे वाचक-
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यामध्ये रोज १२ लाख वाचक झोपून उठल्यानंतर पहिल्यांदा 'लोकमत' वाचतात. जे प्रमाण स्पर्धक वृत्तपत्रापेक्षा १९% जास्त आहे. मजकुरात प्रयोग असल्याचे वाचक सांगतात.