पुणे : ‘लोकमत महामॅरेथॉन’ या राज्यातील ५ शहरांत आयोजित ‘सर्किट रन’मधील अखेरची शर्यत पुण्यनगरीत रंगणार आहे. राज्यात प्रथमच होत असलेल्या अशा प्रकारच्या ‘सर्किट रन’ला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद लाभला. पुण्यात या ‘सर्किट रन’चा समारोप होत असल्याने त्यात सहभागी होण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. त्यांच्या आग्रहास्तव या ‘महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणीची मुदत वाढविण्यात आली आहे. आता या शर्यतीत सहभागी होण्यासाठी ११ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन तसेच आॅफलाईन पद्धतीने नावनोंदणी करता येणार आहे.व्हीटीपी रिअॅल्टी प्रस्तुत आॅक्सिरिचच्या सहयोगाने आणि बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलापासून या शर्यतीचा थरार रंगेल. यात सहभागी होण्यासाठी पूर्वी ७ फेब्रुवारी ही नावनोंदणीची अंतिम मुदत होती. मात्र, नागरिकांच्या आग्रहास्तव ती वाढविण्यात आली असून आता ११ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी६ या वेळेत आॅनलाईन आणि पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील केंद्रांवर आॅफलाईन नोंदणी करता येईल.नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वेगवेगळ्या स्तरांतून मोठ्या संख्येने या शर्यतीसाठी सहभाग निश्चित केला जात आहे. अनेक संस्थांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला असून हजारो पुणेकरांच्या सहभागाने ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. आतापर्यंत नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर या शहरांत झालेल्या महामॅरेथॉनला लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता, पुण्यात होणारी या ‘सर्किट रन’च्या समारोपाची शर्यत ‘न भूतो...’ ठरणार, हे निश्चित!शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी धावणे हा स्मार्ट व्यायामप्रकार आहे. ‘लोकमत’ने ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे घोषवाक्य घेऊन ‘महामॅरेथॉन’सारखा स्मार्ट उपक्रम राबविला आहे. याचे साक्षीदार होण्यासाठी आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. सर्वच गटांतील शर्यतीमध्ये धावण्यासाठी विविध वयोगटांतील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. आंतरराष्ट्रीय धावपटूंसह शहरातील आबालवृद्ध, उद्योजक, अधिकारी वर्ग, संरक्षण दलातील सैनिक आणि हौशी धावपटू या ‘महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहेत.या शर्यतीतील विजेत्यांना सहा लाख रुपयांची बक्षिसे तर मिळणार आहेतच; पण त्याहीपेक्षा वेगळे आहे ते १० तसेच २१ किलोमीटरची शर्यत पूर्ण करणाऱ्यांना मिळणारे पदक. वृत्तपत्र क्षेत्रामध्ये वृत्तपत्रविक्रेत्यांचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे.वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांची भल्या पहाटेपासून धावपळ सुरू होते. वृत्तपत्रविके्रत्यांच्या कार्याचा सन्मान करणारे हे पदक खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. या ‘लिमिटेड एडिशन’ पदकामुळे१० व २१ किमीची शर्यत धावपटूंचे लक्ष वेधून घेत आहे.आदर्श समाजोपयोगी उपक्रम!महामॅरेथॉन ही खेळाडू तसेच नागरिकांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भक्कम करण्याचे साधन बनत आहे. ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे ब्रीदवाक्य असलेल्या सर्किट रनचा समारोप पुण्यात होणार आहे. राज्यातील ५ शहरांत महामॅरेथॉनच्या रूपात होणारी सर्किट रन ही ‘लोकमत’ची अभिनव संकल्पना म्हणजे आदर्श असा समाजोपयोगी उपक्रम आहे. आम्ही राज्याच्या क्रीडा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग अर्थातच या महामॅरेथॉनमध्ये धावणार आहोत. पुण्यातील खेळाडू आणि नागरिकांनी यात सहभाग घ्यावा. ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या माध्यमातून अनेक प्रतिभावान खेळाडू घडतील, असा विश्वास आहे. या महामॅरेथॉनचे नाव जागतिक मॅरेथॉनच्या नकाशावर झळकावे व आगामी वर्षात ‘लोकमत’ने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करावी, यासाठी शुभेच्छा.- नरेंद्र सोपल, सहसंचालक,क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्यचला, आनंदी आयुष्यासाठी धावू या!महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांशी जोडले गेलो आहोत. ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या निमित्ताने यातील काहींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे उत्साह आणि ऊर्जा तर मिळतेच; परंतु इतरांना पाहून नवे काहीतरी करण्याची प्रेरणाही मिळते. फास्टफूडच्या जमान्यात या महामॅरेथॉनच्या निमित्ताने जनजागृती होत आहे. मेंदूला व्यवस्थित रक्त पोहोचविण्यासाठी काम व्यायाम खूप उपयोगी आहे. व्यायामामुळे शरीरात ‘हॅपी हार्मोन्स’ची निर्मिती होते. हा अनुभव मी घेतलाय... तुम्हीही घ्या. चला, आनंदी आयुष्यासाठी धावू या.- गुरप्रीतसिंग छाब्रा, भागीदार, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनधावणे हा आदर्श व्यायामप्रकार...व्यायाम करणाºयांची एनर्जी लेव्हल उच्च दर्जाची असते. यामुळे कामाचा कितीही भार पडला तरी या दबावाला ते सहज हाताळून उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात. नियमित व्यायाम करणारे तणातणावांचा सामना अधिक चागल्या रीतीने करू शकतात. धावणे हा आदर्श व्यायामप्रकार असल्याचे जागतिक स्तरावर सिद्ध झाले आहे. व्यायामासोबतच पोषक तत्त्वे असलेला आहारदेखील आवश्यक आहे. ‘नेचर्स लाइफस्टाइल कॅफे’च्या माध्यमातून असा आहार देण्याचे कार्य आम्ही हाती घेतले आहे. 'लोकमत महामॅरेथॉन' या उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यायामाचे, धावण्याचे फायदे पोहोचवण्याची संधी मिळाल्याचे समाधान आम्हाला आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमास शुभेच्छा!- विनोद पटेल, मुख्य व्यवस्थापकीय संचालक,नेचर्स लाइफस्टाइल कॅफेआज आधुनिक जगात यशाची परिमाणे ही परफॉर्मन्सशी निगडित आहेत. आपली कार्यक्षमता उत्तम असण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक असते. यासाठी अर्थातच व्यायाम महत्त्वाचा आहे. 'हेल्दी पुणे, हॅपी पुणे' हे उद्दिष्ट ठेवून 'लोकमत'ने उचललेले महामॅरेथॉन हे अभिनव पाऊल आहे. ‘स्वच्छता पार्टनर’ म्हणून बीव्हीजीच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी होत असल्याचा आनंद आहेच; त्याहीपेक्षा जास्त समाधान पुणेकरांसाठी काम केल्याचे मिळेल.- हणमंत गायकवाड,अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, बीव्हीजीनिरामय आरोग्यासाठी धावणे हा उत्तम व्यायाम आहे. पुण्याला तंदुरुस्त आणि आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नांत आपले योगदान म्हणून ‘लोकमत महामॅरेथॉन’चा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल. ‘लोकमत’तर्फे आयोजित विविध सामाजिक उपक्रमांप्रमाणे ही शर्यतही यशस्वी ठरेल. माझ्यासह केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमधील सर्व कर्मचारी या शर्यतीत धावणार आहेत. ‘लोकमत महामॅरेथॉन’ला शुभेच्छा.- धनंजय वर्णेकर, संस्थापक-अध्यक्ष,केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलजिद्द्, सातत्य आणि मेहनत म्हणजे मॅरेथॉनधावपटूला निर्धारित वेळेत आणि आपल्या शारीरिक क्षमतेचा अंदाज घेऊन मॅरेथॉन पूर्ण करायची असते. यामागे त्या धावपटूची गेल्या कित्येक वर्षांची मेहनत असते.जिद्द, सातत्य आणि मेहनतीशिवाय ५, १० किलोमीटर आणि त्यापेक्षा जास्त अंतर पार करणे सोपे नसते. त्याकरिता खेळाडूला अथकपणे मैदानावर घाम गाळावा लागतो.असा असेल शर्यतीचा मार्ग...ही शर्यत ३, ५, १० आणि २१ किलोमीटरची असेल. ३ किमी फॅ मिली रन,१२ वर्षांपुढील गटासाठी ५ किमी, १६ वर्षांपुढील गटासाठी १० किमी,१८ वर्षांपुढील गट तसेच डिफेन्स गटासाठी २१ किमी अंतराची शर्यत असेल.पहाटे ५ वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातून या महामॅरेथॉनचा प्रारंभ होईल. त्यानंतर क्रीडा संकुल ते औंध रस्ता - ब्रेमेन चौक - परिहार चौक - बाणेर फाटामार्गे क्रीडा संकुलात ही शर्यत संपणार आहे.फायदे धावण्याचे !सकाळी धावल्यानंतर संपूर्ण दिवस ताजातवाना आणि प्रसन्न जातो.धावल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते. श्वसनाचे विकार बरे होतात.रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.नावनोंदणीसाठी अंतिम तारीख : ११ फेब्रुवारीआॅनलाईन नोंदणीसाठी लिंक - http://www.mahamarathon.com/pune/pune-registrations.phpआॅफलाईन नोंदणीसाठी संपर्क : 020-66848586 (सकाळी १० ते सायं. ६)
लोकमत महामॅरेथॉन : धावपटूंच्या आग्रहामुळे नावनोंदणीस मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 12:42 AM