शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

लोकमत महामॅरेथॉन : येत्या रविवारी रंगणार प्रोमो रन..!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 12:52 AM

‘लोकमत महामॅरेथॉन’ शर्यतीबाबत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील धावपटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह आहे. अशा या भारलेल्या वातावरणामध्ये येत्या रविवारी (दि. १०) महामॅरेथॉनची प्रोमो रन रंगणार आहे.

पुणे : ‘लोकमत महामॅरेथॉन’ शर्यतीबाबत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील धावपटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये उत्साह आहे. अशा या भारलेल्या वातावरणामध्ये येत्या रविवारी (दि. १०) महामॅरेथॉनची प्रोमो रन रंगणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठीही सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात नोंदणी होत आहे.व्हीटीपी रिअ‍ॅल्टी प्रस्तुत आॅक्सिरिचच्या सहयोगाने आणि बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूल यांच्या सहकार्याने ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून या शर्यतीचा थरार रंगणार आहे. तत्पूर्वी, येत्या रविवारी मुख्य शर्यतीच्या ठिकाणी म्हणजेच म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती संकुलापासून प्रोमो रनला प्रारंभ होणार आहे. क्रीडा संकुल ते औंध रस्ता - ब्रेमेन चौक - परिहार चौक - बाणेर फाटामार्गे पुन्हा क्रीडा संकुल असा शर्यतीचा मार्ग असेल. प्रोमो रनमध्ये ५ आणि १० किलोमीटर गटांचा समावेश असेल. प्रोमो रनसाठी नोंदणी केलेल्या सर्व धावपटूंनी रविवारी पहाटे सव्वापाच वाजता शर्यतीच्या ठिकाणी हजर असणे आवश्यक आहे. १० किलोमीटरची शर्यत सव्वासहा वाजता सुरू होईल. त्यानंतर साडेसहा वाजता ५ किलोमीटर अंतराच्या शर्यतीला प्रारंभ करण्यात येणार आहे.या प्रोमो रनसाठी नावनोंदणी मोफत आहे. शिवाय प्रोमो रनपूर्वी टेक्निकल वार्म अप आणि नंतर अल्पोपाहाराची व्यवस्था ‘लोकमत’तर्फे करण्यात आली आहे. प्रोमो रनमध्ये सहभागी होण्यासाठी ०२०-६६८४८५८६ या दूरध्वनी क्रमांकावर नावनोंदणी करता येईल.राज्यातील ५ शहरांत ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉनच्या रूपातील ‘सर्किट रन’मधील अखेरची शर्यत पुण्यनगरीत रंगणार आहे. आतापर्यंत नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर या शहरांत झालेल्या महामॅरेथॉनला लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता, पुण्यात होणारी या ‘सर्किट रन’च्या समारोपाची शर्यत ‘न भूतो...’ ठरणार, हे निश्चित!महामॅरेथॉनमध्ये सहभागासाठी पूर्वी ७ फेब्रुवारी ही नावनोंदणीची अंतिम मुदत होती. मात्र, नागरिकांच्या आग्रहास्तव ती वाढविण्यात आली असून, आता ११ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाइन तसेच सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील केंद्रांवर आॅफलाइन नोंदणी करता येईल.हेल्थ टिप्स...कमीत कमी साधने आणि विशिष्ट प्रकारच्या मैदानासाठी अट नसलेला धावणे हा व्यायामप्रकार आरोग्याकरिता आदर्श आहे. सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष हा व्यायाम सहजतेने करू शकतात. धावण्यामुळे शारीरिक शक्ती वाढते. कंबर आणि गुडघे लवचिक असल्यास अधिक वेगाने आणि प्रभावीपणे धावणे शक्य होते. उत्तम अ‍ॅथलिट होण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. धावण्याचा व्यायाम सातत्याने केल्यास शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यास मोठी मदत होते.- डॉ. पराग संचेती,चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, संचेती हॉस्पिटलमॅरेथॉनमय वातावरणाची नांदीसन १९६४ च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये मॅरेथॉन प्रकारात मी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तेव्हा मॅरेथॉन हा प्रकार आताप्रमाणे लोकप्रिय नव्हता. अलीकडे मात्र चित्र बदलले आहे. हल्ली पुण्यात तर सातत्याने मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात येते. ‘लोकमत’सारख्या तळागाळात पोहोचलेल्या वृत्तपत्राने ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे ब्रीदवाक्य ठेवून आयोजित केलेल्या ‘महामॅरेथॉन’मुळे राज्यातील वातावरण मॅरेथॉनमय होण्यास मोठी मदत होणार आहे. राज्यातील ५ शहरांत मॅरेथॉनचे आयोजन, हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल. धावण्यामुळे हृदयाची क्षमता वाढते. शर्यतीच्या निमित्ताने एकत्र धावण्यामुळे एकोपा वाढण्यास मदत होणार आहे. महामॅरेथॉनला शुभेच्छा!- बाळकृष्ण आकोटकर, १९६४च्या टोकियो आॅलिम्पिकमध्येसहभागी झालेले भारताचे माजी मॅरेथॉनपटूकुठलीही नवी गोष्ट शिकायची म्हणजे त्या गोष्टीची शास्त्रोक्त माहिती घेणे गरजेचे ठरते. याला मॅरेथॉनदेखील अपवाद नाही. मुळात आपल्याला मॅरेथॉन म्हणजे केवळ धावायचे, पळायचे एवढेच काय ते माहिती असते. प्रत्यक्षात त्याच्याशी अनेक शास्त्रीय, मानसिक संकल्पना जोडल्या गेल्या असतात.आवश्यक ती शारीरिक क्षमता अंगी यावी यासाठी धावपटूने सतत धावण्याचा सराव करणे, धावण्याला योग्य आहार व योग्य मानसिक क्षमतेचा आधार असणे गरजेचे आहे. बरेचदा केवळ धावण्याची शास्त्रीय अंगाने माहिती असून कामाचे नाही, त्याच्या जोडीला इतर बाबींची माहिती आणि सराव धावपटूला नितांत गरजेचा आहे.सध्या तरुणांबरोबरच ज्येष्ठांची संख्या मँरेथॉनमध्ये पाहावयास मिळते. त्या वयातही त्यांचा उत्साह जराही कमी नसतो. याचे कारण योग्य आहार, योग्य व्यायाम, अनेक ज्येष्ठ तरुणांना लाजवेल अशा उत्साहात ५ ते १० किलोमीटरपर्यंत अथकपणे धावतात, हे आश्चर्य म्हणावे लागेल. याला सततचा सराव व प्रचंड इच्छाशक्तीची साथ असावी लागते.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती संकुलापासून प्रोमो रनला प्रारंभ होईल. क्रीडा संकुल ते औंध रस्ता - ब्रेमेन चौक - परिहारचौक - बाणेर फाटामार्गे पुन्हा क्रीडा संकुल असा प्रोमो रनचा मार्ग असेल.प्रोमो रनपूर्वी टेनिक्नल वॉर्मअप आणि नंतर अल्पोपाहार व्यवस्था ‘लोकमत’तर्फे करण्यातआली आहे.अशी करा नावनोंदणी...प्रोमो रनसाठी नावनोंदणी मोफत असली तरी अनिवार्य आहे.प्रोमो रनसाठी नावनोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख९ फेब्रुवारी आहे.०२०-६६८४८५८६ या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधून नोंदणी करता येईल.\

नावनोंदणीसाठी अंतिम तारीख : ११ फेब्रुवारीआॅनलाईन नोंदणीसाठी लिंक - http://www.mahamarathon.com/pune/pune-registrations.phpआॅफलाईन नोंदणीसाठी संपर्क : 020-66848586 (सकाळी १० ते सायं. ६)

टॅग्स :MarathonमॅरेथॉनPuneपुणे