पुणे : संगीत क्षेत्रातील ख्यातनाम कलाकार उस्ताद राशीद खान यांचे अभिजात स्वर, ‘मोहनवीणा’चे निर्मितीकार पं. विश्वमोहन भट यांचे बहारदार वादन अन् पं. योगेश समसी व पं. विजय घाटे यांचे तबल्यावरील थापेतून उलगडणारे ‘तालसौंदर्य’ अशा सुरेल आविष्कारांच्या अद्वितीय अनुभूतीतून रसिकांची दिवाळी पहाट ‘स्वरचैतन्या’ने बहरणार आहे.
डॉ. सागर गणपतराव बालवडकर प्रस्तुत आणि कोहिनूर, आयव्ही युनिव्हर्स, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, लाेकमान्य साेसायटी, व्हिजन, रांका ज्वेलर्स व एएनपी कॉर्पोरेशन यांच्या सहयोगाने रविवारी (दि. २३) ५.३० वाजता बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पस, सी. एम. इंटरनॅशनल स्कूल मैदान येथे ही स्वरचैतन्याची मनसोक्त उधळण होणार आहे. ‘दिवाळी पहाट’ सप्तसुरांच्या मंगलमयी आविष्कारांमध्ये साजरा करण्याची अनोखी पर्वणी रसिकांना मिळणार आहे.
गेल्या आठ वर्षांपासून ‘दिवाळी पहाट’चा उपक्रम राबविला जात असून, त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चातकाप्रमाणे दिवाळी पहाटची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रसिकांची दीपावली गायन आणि वादनाच्या अद्वितीय सादरीकरणांमधून गोड होणार आहे. कलाकारांना साबीर खान (सारंगी), विनय मिश्रा (हार्मोनिअम) साथसंगत करणार आहेत. आनंद देशमुख हे बहारदार निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाला काका हलवाई स्वीट सेंटर, सिद्धी असोसिट्स, एआयएसएसएमएस, सुरभि आणि मनोहर यांचा सहयोग लाभला आहे.
प्रवेशिका विनामूल्य
- एसकेपी कॅम्पस, बाणेर बालेवाडी- रांका ज्वेलर्स, आस्ट्रिक्स प्लाझा, डेरॉन हाइटस, बाणेर- लोकमान्य मल्टिपर्पस को-ऑप सोसायटी बँक, विधाते टॉवर, औंध- माय वर्ल्ड सोसायटी, बालेवाडी हाय स्ट्रीट, बाणेर- काका हलवाई स्वीट सेंटर, आयुर्वेद रसशाळेसमोर, कर्वे रोड, एरंडवणे- जयराज हाइट्स, न्यू दत्तनगर, शंकर कळवनगर, वाकड- अब्जा पॅव्हेलियन रागदारी सोसायटी, औंध- महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
कधी : रविवारी (दि. २३) पहाटे ५.३०
कुठे : एसकेपी कॅम्पस ग्राऊंड, बालेवाडी