शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

गप्पाटप्पांतून उलगडले नात्यांचे ‘रणांगण’ , नोबल हॉस्पिटलच्या सहयोगाने ‘लोकमत सखी मंच’चा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 3:58 AM

पुणे - लोकमत सखी मंच आयोजित सहयोगी प्रायोजक नोबल हॉस्पिटल सहयोगी, रेड एफ आणि सिझन्स मॉल यांच्या सहकार्याने ‘गप्पाटप्पा रणांगण चित्रपटाच्या कलाकारांसोबत’ हा कार्यक्रम सिझन्स मॉल, हडपसर येथे सखींच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी ख्यातनाम कलाकार नृत्याचे महागुरू सचिन पिळगावकर, चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी, प्रणाली घोगरे व दिग्दर्शक राकेश सारंग ...

पुणे - लोकमत सखी मंच आयोजित सहयोगी प्रायोजक नोबल हॉस्पिटल सहयोगी, रेड एफ आणि सिझन्स मॉल यांच्या सहकार्याने ‘गप्पाटप्पा रणांगण चित्रपटाच्या कलाकारांसोबत’ हा कार्यक्रम सिझन्स मॉल, हडपसर येथे सखींच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी ख्यातनाम कलाकार नृत्याचे महागुरू सचिन पिळगावकर, चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी, प्रणाली घोगरे व दिग्दर्शक राकेश सारंग हे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ या प्रसिद्ध गीताचे रसिक प्रेक्षकांसमोर नव्याने सादरीकरण फेसबुक लाईव्हने करण्यात आले.या वेळी स्वप्निल जोशी म्हणाला, ‘आयुष्यातील सर्वांत मोठी युद्धे ही स्वयंंपाक घरात सुरू होतात. ज्याला स्वयंपाक घरातील युद्ध जिंकता आले त्याने घर जिंकले आणि ज्याने घर जिंकले त्याने आयुष्य जिंकले. आमच्या चित्रपटातील रणांगण देखील असेच आहे. ते फक्त स्वयंपाक घरात सुरू न होता चार भिंतीच्या आत सुरू होते. आपण बाहेरच्या माणसांशी कितीही वाद घालू शकतो-लढू शकतो, पण जेव्हा आपल्या समोर आपलीच माणसं उभे असताततेव्हा, त्यासारखे दुसरे मोेठे दु:खनाही. आणि ही व्यथा एक स्त्रीच समजू शकते. आपल्या माणसांचे सतत चांगले करत राहणे,सतत आपल्या माणसांकडून अपमान सहन करूनदेखील आपल्या माणसांच्या सुखासाठी प्रयत्नकरत राहणे हे जितके स्त्रीलाजमते ते एका पुरुषाला कधीही जमणार नाही.’सचिन पिळगावकर म्हणाले, ‘बदल सिनेमा सृष्टीतील असो अथवा अन्य, कोणत्याही परिस्थितीला असो, बदल ही कधीही न थांबणारी गोष्ट आहे. मी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटने चित्रपटात काम करण्याला सुरुवात केलीे. आणि त्यातून रंगीत चित्रपट सृष्टीकडे जाताना होणारे बदल मी स्वत: अनुभवलेले आहेत. त्याच बरोबर मराठी सिनेसृष्टीत अनेक बदल घडत गेले. प्रेक्षकांचा अवेअरनेस वाढत गेला. त्यामुळे आम्हाला अजून शिकायला लागले. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी आत्मसात करायला लागल्या. यामध्ये एकमेव गोष्ट आहे, की जी बदलली नाही, ती म्हणजे भारतीय लोकांच्या भावना होय. लोकमत सखी मंच तर्फे आयोजित या कार्यक्रमात सखी मंचच्या महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सख्यांचे आणि ‘लोकमत’चे भरपूर मनापासून आभारी आहे. ’याप्रसंगी उपस्थितांना कलाकारांच्या हस्ते प्रश्नमंजूषा स्पर्धेचे विशेष पारितोषिक विजेत्या नीलम वाघ, रेखा होनकांडे, सुनीता बागडे यांना देण्यात आले.या वेळीसखी मंचच्या महिलांसाठी ‘१ मिनिट गेम शो’ रिंग (पास द रिंग), जम्प इन जम्प आउट हे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेLokmatलोकमतnewsबातम्या